आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Examination Fees Waived Due To Drought ; The Board Even Gave A Check, But The Deadline Was Gone!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळात परीक्षा शुल्क माफ; बोर्डाने धनादेशही दिले, पण मुदतच संपली!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर : otherमागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्य सरकारने दहावीसह बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली. धारूर तालुक्यातील दहावीच्या सहाशे विद्यार्थ्यांचे धनादेश शिक्षण विभागाने शाळेला दिले. परंतु धनादेशांची मुदतच संपल्याने ते शिक्षण विभागाला परत करण्याची नामुष्की आली आहे. धनादेश उशिरा वाटप केल्याने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दोन दिवसांत शाळांनी १८ धनादेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे परत केले आहेत. जे धनादेश कालबाह्य झालेत ते आमच्याकडे पाठवा, असे बाेर्डाने सांगीतले असून त्यांची तारीख बोर्ड वाढवून देणार आहे.

दुष्काळामुळे मागील वर्षी राज्य सरकारने दहावी व बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ माफ केले. त्यानुसार दहावीत शिकणाऱ्या तालुक्यातील अकरा शाळांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीचे धनादेश औरंगाबाद बोर्डाने काढले. प्रत्येकी ३७५ रुपयांचे ६०० विद्यार्थ्यांचे धनादेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून धारूर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला ६ नोव्हेंबर २०१९ रोजी प्राप्त झाले. या धनादेशांवर २१ ऑगस्ट २०१९ ही तारीख असून हे धनादेश हे बँक ऑफ इंडियाचे आहेत . शाळा सुरू झाल्यानंतर हे धनादेश संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. धनादेश असणारे विद्यार्थी हे पुढील शिक्षणासाठी शाळा सोडून गेल्याने त्यांना धनादेश मिळण्यास उशीर झाला होता. काहींना तर धनादेश हातात पडण्यापूर्वीच २१ नोव्हेंबर २०१९ ही धनादेश वटवण्याची मुदतही संपली होती. तर ज्यांच्या हातात धनादेश मिळाले त्यांची तारीख संपल्याने परत आले. सदरील धनादेश हे विद्यार्थ्यांच्या नावाचे असून अकाऊंट पे आहेत. त्यामुळे त्यांना बँकेत खाते उघडावे लागले. त्यात रक्कमही कमी असल्याने खाते उघडणे व धनादेश जमा करण्यासाठी चकरा मारणे हा खर्चच धनादेशापेक्षा अधिक होत आहे. काही शाळांनी धनादेश न वटल्याने शिक्षण विभागास परत देण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत १८ धनादेश परत केले आहेत. शुल्क माफ करून मिळालेले धनादेश उशिरा मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे .
विद्यार्थ्यांच्या हाती मुदत संपलेले चेक पडले.

चेक परत जमा करणे सुरू


ज्या विद्यार्थ्यांचे धनादेश पास झाले नाहीत ते धनादेश आम्ही परत जमा करण्यास सुरुवात केली आहे. सदरील धनादेश बदलून कसे देता येतील या साठी प्रयत्न सुरू आहेत . -जाधव, केंद्रप्रमुख धारूर

बोर्ड तारीख वाढवून देणार


औरंगाबाद बोर्डाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. जे धनादेश कालबाह्य झाले आहेत ते आमच्याकडे पाठवा, असे बोर्डाने सांगितले असून बोर्ड त्यांची तारीख वाढवून देणार आहे. -मोहन काकडे, शि. वि. अधिकारी.

मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न


धारूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचे सहाशे धनादेश मिळाले होते . परंतु सदरील धनादेश हे आमच्याकडेच उशिरा मिळाल्याने धनादेशाचा तीन महिन्यांचा कालावधी संपला आहे. असे धनादेश जमा करून मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे . - गौतम चोपडे, गट शिक्षणाधिकारी, धारूर

उशिरा धनादेश जमा केले
 
आम्हाला प्राप्त झालेले धनादेश पास करण्यासाठी आम्ही बँकेकडे पाठवले आहेत. १०० पेक्षा अधिक धनादेश आमच्याकडे आले होते. त्यांची मुदत संपत आली होती . - मिलिंद रोटे, शाखाधिकारी, भारतीय स्टेट बँक, धारूर.
 

बातम्या आणखी आहेत...