आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - राज्यात समान तारखांना तीन महत्त्वाच्या परीक्षा जाहीर झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, यातील काही परीक्षा वेगवेगळ्या शहरांत असल्याने तर एकाच दिवशी दोन परीक्षा आहेत. या तिन्ही परीक्षांसाठी राज्यभरातील अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक विद्यार्थी अनेक वर्षांपासून तयारी करत होते. तारखांचे पुनर्नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे.
> जूनमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापत्य अभियंता या पदासाठी पूर्वपरीक्षा झाली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी होत आहे.
> जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता या पदाच्या भरतीसाठी २५ व २६ नोव्हेंबरला परीक्षा.
> मुंबई महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता या पदासाठीची लेखी परीक्षाही २५ नोव्हेंबरला आहे.
तीन वर्षांपूर्वी कोर्टातून मिळवली होती स्थगिती :
जलसंपदा विभागातील ही भरती २०१६ नंतर प्रथमच होत आहे. तिन्ही परीक्षा एकाच अर्हतेचा विद्यार्थ्यांसाठी होत असल्याने यापैकी एखाद्या संधीस त्यांना मुकावे लागू शकते. तीन वर्षांपूर्वी अशी परिस्थिती उद्भवली असता काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाऊन एका परीक्षेच्या तारखेवर स्थगिती आणली होती.
वेळापत्रकात बदल करावा
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत राज्यपालांना विनंती पत्र पाठवले असून आमदार रोहित पवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत पाठपुरावा करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.