आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिकपणाचे उदाहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील सहा महिन्यांच्या वास्तव्यात पाश्चिमात्यांना फार जवळून पाहण्याचा, त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा, दैनंदिन जगरहाटी पाहण्याचा योग आला होता. आपण उत्सुकतेपोटी विचारलेल्या प्रश्नांची तेथील स्त्री किंवा पुरुष दोघेही कोणताही आडपडदा न ठेवता, मनमोकळी उत्तरे देत असत. मोजकेच बोलत पण आपले समाधान करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. मीही त्यांना कधी गमतीने भारतात येण्याचा आग्रह करत असे, ते हसून थँक्स म्हणत. अमेरिकेत माझा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी लॅपटॉपवर मराठी पेपर वाचून होत असत. संध्याकाळी पायी फिरायला जात होतो. उत्तर पश्चिमेला असणा-या वॉशिंग्टन राज्यातील वातावरण व हवामान अत्यंत लहरी होते. क्षणात पाऊ स तर क्षणात ऊन तर क्षणात बर्फवृष्टीही होत असे. बाहेर पडताना नेहमी छत्री, मोबाइल बरोबर ठेवत होतोच. निसर्गदृश्ये टिपण्यासाठी कॅमेराही वापरत होतो. सिएटल येथील संध्याकाळ म्हणजे भारतात तेव्हा सकाळ असायची. मी आप्तेष्ट, नातेवाइकांशी याचवेळी संवाद साधत होतो. मी राहत होतो त्या भागात एक भलेमोठे स्टेशनरीचे दुकान, त्याला लागून रेस्टॉरंट, कॅफेटेरिया यांच्यासमोरच प्रशस्त असा वाहनतळ होता. पार्किंग स्लाटच्या कडेने बाकावर बसण्याची सोय होती. मी एका ठरावीक बाकावर बसत होतो. एकदा त्या बाकावर माझी छत्री, मोबाइल आणि कॅमेरा वगैरे वस्तू विसरून गेल्या. माझ्या मोठ्या भावाचे अचानक निधन झाल्याची बातमी मला समजली होती. त्यामुळे माझ्या मनात विचाराचे काहूर उठले होते. त्या तणावामुळे वस्तू तेथेच विसरल्या गेल्या. पुढे सलग तीन-चार दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे मला बाहेर पडता आले नाही. वातावरण निवळल्यानंतर परत वस्तू आणण्यासाठी सहज पाहून यावे म्हणून तेथे गेलो. इतकी वर्दळ असूनही माझ्या वस्तू तेथल्या तेथे तशाच होत्या. मलाच या गोष्टींचे आजही राहून राहून आश्चर्य वाटते.