आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त गरम चहा शरीरासाठी नुकसानदायी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्हाला जास्त गरम चहा पिण्याची सवय आहे तर ही सवय बदला. यामुळे पोटासंबंधी कित्येक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. एका दिवसात तीन कपापेक्षा जास्त चहादेखील नुकसानदायक आहे.

चहामुळे शरीरावर परिणाम  : ब्रिटिश संशोधकांनी याबाबत संशोधन केले. त्यांना असे आढळून आले की, गरमीच्या एका दिवसात शीतपेय प्यायल्यावर ०.५ डिग्री शरीराचे तापमान कमी होते. फक्त ९ मिनिटांच्या आत आइस टी प्यायल्यास तापमान ०.८ डिग्रीपर्यंत कमी होऊन जाते. जर गरम चहा प्यायल्यास शरीराचे तापमान १-२ डिग्रीपर्यंत कमी होऊन जाते. म्हणजे गरम चहामुळे शरीर पटकन थंड होते.

जास्त गरम चहा पिऊ नका : ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित स्टडीनुसार जास्त गरम चहा पिल्याने तोंडाद्वारे पोटाला जोडणाऱ्या नळयांवर त्याचा प्रभाव पडतो.जे लोक खूप गरम चहा पितात, त्यांना अन्ननलिकेशी संबंधित समस्या होतात.यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शंका वाढते. तज्ञांचे म्हणणे आहे की जास्त गरम चहा पिल्याने रक्तवाहिकांचे नुकसान होते.

होणारे नुकसान : चहामध्ये टॅनीन, टायलिन असते.याला जास्त पिल्याने अपचन होऊ शकते. पोटासंबंधी समस्या वाढतात, चहामध्ये फ्लोराइड असते, याने हाडे कमकुवत होतात. यामुळे सारखी सारखी यूरिनची समस्या होते. यात सोडियम,पोटॅशियम सारखे खनिजे शरीरातून बाहेर फेकले जातात व अशक्तपणा वाढतो., चहामध्ये कॅफीन असते, सारखा सारखा चहा पिल्याने चक्कर,डोकेदुखी,थकावट जाणवते.

बातम्या आणखी आहेत...