आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील एका इंग्रजी चित्रपटावरून दिग्दर्शकाला सुचली होती 'तान्हाजी'ची कल्पना, थ्रीडीत झळकणार चित्रपट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई (अमित कर्ण) ः अजय देवगणचा शंभरावा चित्रपट 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'चा ट्रेलर मंगळवारी रिलीज होणार आहे. तत्पूर्वीच दिव्य मराठीच्या हाती अजय देवगणचा एक्सक्लुझिव्ह फर्स्ट लूक लागला आहे. एवढेच नाही तर आम्ही आपल्या वाचकांसाठी चित्रपटाशी संबंधित खास माहितीदेखील घेऊन आलो आहोत. याबाबत स्वत: सांगत आहेत याचे दिग्दर्शक ओम राऊत...


'13 वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक इंग्रजी चित्रपट पाहत होतो, त्याचवेळी मला या चित्रपटाची कल्पना सुचली होती. तो खूपच उत्तम चित्रपट होता. चित्रपट पाहून मी बाहेर पडलो तेव्हा ही कथा आमच्या मराठा साम्राज्यासारखीच असल्याचे मी एका अमेरिकन मित्राला सांगितले होते. या कथा मला लहानपणी आजी ऐकवत असे. आजी म्हणायची की, शिवाजी महाराजांच्या फौजेचे सुभेदार तानाजी मालसुरे यांनी सिंहगडाचा मुघलांपासून बचाव केला होता. त्यानंतर मी या कथेवर चार वर्षांपूर्वी काम करण्यास सुरुवात केली. दाेन वर्षे यावर काम केल्यानंतर ही कथा सर्वात आधी अजय देवगणला ऐकवली. त्याला ती इतकी आवडली की, त्याने याची निर्मिती करण्याचेदेखील ठरवले.'

  • चित्रपट सुंदर बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला. तो थ्रीडीमध्ये शूटही करण्यात आला.
  • अजयचा लूक स्लिम ट्रिम नाही. यामध्ये त्याची पिळदार शरीरयष्टी दिसेल.
  • यामध्ये तानाजीपासून ते इतर पात्रांपर्यंतच्या वेशभूषेमध्ये इतिहास आणि आधुनिकता दोन्हींचा मेळ बसवला.