आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियमित बेंच डिप्स व्यायाम करा, कमरेवरचा भाग राहील मजबूत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बेंच डिप्स ट्रायसेप्स छाती आणि खांदे यांच्या मजबुतीसाठी अतिशय चांगला व्यायाम आहे. तसेच, यामुळे कमरेच्या खालच्या भागाची चरबी कमी होते. हा व्यायाम केल्याने स्ट्रेंथ ट्रेनिंगची क्षमता वाढते. एका बेंचवर व्यायाम करणे कठीण जात असेल तर दोन बेंचचा वापर करून तुम्ही हा व्यायाम करू शकता.

  • करण्याची पद्धत

हा व्यायाम करताना बेंचच्या आधारे डिप्स लावले जातात. डिप्स लावण्यासाठी दोन्ही हाताने बेंच धरून ठेवा परत गुडघ्यात वाकून खांद्यावर जोर देऊन संपूर्ण शरीर खाली आणि वर करा. यादरम्यान तुम्ही दोन्ही पाय टेबलच्यावर ठेऊ शकता. तुम्ही हा व्यायाम जिम, पार्क किंवा घरीदेखील करू शकता. यात कोपरे ९० अंशांपेक्षा जास्त वाकवू नका. क्षमतेनुसार २० रिपिटेशन आणि ४ सेट करू शकता.

  • या गोष्टींची काळजी घ्या

> आपले कोपरे बेंचच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. > हाताने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे खांद्यांमध्ये वेदना होऊ शकते. >  खांद्याऐवजी हातावर लक्ष केंद्रित करा.

  • जाणून घ्या याचे आणखी चार फायदे

हाडे मजबूत होतात :-
बेंच डिप्समुळे शरीरातील पोषक तत्त्वंाचे शोषण करून हाडांना पुरवले जातात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि फ्रॅक्चर होत नाहीत.

एनर्जी क्षमता वाढते:-
यामुळे मेंदूतील एंडोर्फिनची पातळी वाढते ज्यामुळे ऊर्जा वाढते आणि मन शंात राहाते. हा व्यायाम केल्याने मानसिक विकास होतो आणि तनाव कमी करण्यास मदत होते.

दुखापतीचा धोका कमी असतो :
 दुखापतीपासून बचाव करण्यासाठी सांधे आणि ऊती मजबूत केल्या पाहिजे. त्यासाठी हा व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुुळे दुखापत होण्याचा कमी धोका असतो.

बॉडी स्ट्राँग बनवा :
हा व्यायाम केल्याने छातीचे स्नायू आणि हाडाची झीज यासारख्या समस्या दूर होतात. स्ट्राँग बॉडी ठेवणाऱ्यांसाठी हा उत्कृष्ट व्यायाम आहे. स्नायूदेखील मजबूत होतात.