आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exercise Information For Workin Woman And Housewife

नोकरदार स्त्री, गृहिणी यांनी पाळावे व्यायामाचे हे नियम 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फिटनेस टिकवून ठेवणे हे पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी अवघड असते. घर आणि बाहेरील कामांशिवाय मुलांची जबाबदारी देखील पार पाडावी लागते. अशावेळी पुढे जाण्याच्या स्पर्धेत त्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देत नाहीत. येथे सांगितलेले आसनांचे काही नियम तुम्हाला फिट ठेवण्यास मदत करतील. 

सूज, थकवा कमी होईल 
- खुर्चीवर बसावे. पायांना ३० सेकंद सरळ ठेवावे. असे थोड्या थोड्या वेळाने केल्यास पायांमध्ये सूज किंवा थकवा येत नाही. पायाच्या दुखण्यांना आराम मिळतो.
- खुर्चीवर बसून पायांना सरळ ठेवा. अंगठ्याला जमिनीवर टेकवून एकवेळा क्लॉकवाइज आणि नंतर अँटीक्लॉकवाइज फिरवा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो. 
- खुर्चीवर बसून तुमच्या डोक्याला डाव्या हाताने उजव्या बाजूला घेऊन जा. १५ ते २० सेकंद असेच ठेवल्यानंतर डोक्याला उजव्या हाताने डाव्या बाजूला न्या. याला ट्रेक टि‌्वस्ट असे म्हणतात. 

लवचिकपणा वाढेल 
- व्यायाम सुरू करण्यापूर्वी मांसपेशींना लवचिक करणे गरजेचे आहे. यामुळे स्ट्रेचिंगसारख्या व्यायामाने सुरुवात करावी. यामुळे लवचिकता वाढते. 
- दररोज वॉकिंग करा. हे तुमचे खांदे, शरीराच्या खालचा भाग, मांड्या आिण पायांच्या स्नायूंना सक्रिय बनवण्यास मदत करते. यासाठी वॉकिंग करणे फायदेशीर आहे. 
- तुमच्यासाठी जंपिंग जॅक एक चांगला व्यायाम आहे. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. वजन कमी करण्यासाठी हे दररोज करणे फायदेशीर आहे.