Home | National | Delhi | Exit Poll of MP CG Rajasthan Telangana and Mizoram assembly Ecection 2018

एक्झिट पोल : मध्यप्रदेशच्या 6 पैकी 3 सर्वेमध्ये भाजपला बहुमत, राजस्थानात 3 पैकी 2 काँग्रेसच्या बाजुने

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 06:56 PM IST

मप्र-छगमध्ये भाजप 15 वर्षांपासून सत्तेत आहे. मिझोरममध्ये काँग्रेस 10 वर्षांपासून सत्तेत आहे. तेलंगणाची ही दुसरी विधनसभा

 • Exit Poll of MP CG Rajasthan Telangana and Mizoram assembly Ecection 2018

  नवी दिल्ली - राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदान थांबताच पाच राज्यांच्या एक्झिट पोलचे आकडे येण्यास सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेशचे आतापर्यंत दोन सर्वे समोर आले आहेत. त्यात अॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडेच्या सर्वेत मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होईल असा अंदाज वर्तवला आहे. तर टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या सर्वेत भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. या दोन्ही सर्वेमध्ये छत्तीसगडचा किल्ला भाजप राखणार असा अंदाज वर्तवला आहे.  1) मध्यप्रदेश
  मध्यप्रदेशात 230 जागा आहेत. 28 नोव्हेंबरला झालेल्या मतदानात 75 टक्के मतदारांनी मतदान केले. 2013 मध्ये भाजपने 165 आणि काँग्रेसने 58 जागा जिंकल्या होत्या.

  सर्वे भाजप काँग्रेस इतर
  अॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11
  टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15
  एबीपी-लोकनिती 94 126 10
  इंडिया न्यूज-नेता 106 112 12
  रिपब्लिक 108-128 95-115 7
  न्यूज नेशन 110 107 13


  2) राजस्थान
  राजस्थानात यावेळी 200 पैकी 199 जागांवर शुक्रवारी मतदान झाले. येथे 2013 मध्ये भाजपने 163 आणि काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या.

  सर्वे भाजप काँग्रेस इतर
  इंडिया-टुडे अॅक्सिस 55-72 119-141 04-11
  टाइम्स नाउ-सीएनएक्स 85 105 09
  रिपब्लिक-सी वोटर 83-103 81-101 15


  3) छत्तीसगड
  छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत. येथे 12 नोव्हेंबरला आणि 20 नोव्हेंबरला मतदान झाले. गेल्यावेळी भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागा जिंकल्या होत्या. यावेळी बसपा आणि जोगींच्या छजकां यांची आघाडी आहे. जोगी 2016 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते.

  सर्वे भाजपा काँग्रेस इतर
  इंडिया न्यूज-नेता 43 40 07
  टाइम्स नाउ-सीएनएक्स 46 35 07
  इंडिया टुडे-माइ एक्सिस 21-31 55-65 04-08
  न्यूज नेशन 38-42 40-44 04-08


  4) मिझोरम
  येथील 40 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान झाले होते. येथे 10 वर्षांपासून काँग्रेस सत्तेत आहे. मुख्यमंत्री ललथनहवला तीन वेळा मुख्यमंत्री बनलेले आहेत. 2013 मध्ये काँग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसबा अध्यक्षांसह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप येथे हेमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वात लढत आहे.


  5) तेलंगणा
  राज्यातील 119 जागांवर मतदान झाले. स्वतंत्र राज्य बनल्यानंतर 2014 मध्ये पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत टीआरएसने 63, काँग्रेसने 21, टीडीपीने 15, एआयएमआयएमने 7 आणि भाजपने 5 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सहा महिन्यापूर्वी विधानसभा भंग करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे येथे लवकर निवडणुका होत आहेत.

Trending