declaration of accounts / खातेवाटप जाहीर : विखेंकडे गृहनिर्माण, जयद्दत क्षीरसागरांना रोहयो खाते; तर अतुल सावे उद्योग राज्यमंत्री

विनोद तावडेंकडील सर्व खाती काढली, शेलारांना शिक्षण मंत्रीपद तर गिरीष बापटांचे सर्व खाते संभाजी पाटील निलंगेकरांकडे

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 17,2019 09:54:00 AM IST

मुंबई -रविवारी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना रात्री उशीरा खाते वाटप करण्यात आले. राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागरांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते देण्यात आले आहे. तर, औरंगाबादेतील आमदार अतुल सावेे उद्योग खात्याचे राज्यमंत्री बनले आहेत. विनोद तावडेंकडील सर्व खाती काढण्यात आली असून शेलारांना शिक्षण मंत्रीपद दिले आहे. तर गिरीष बापटांचे सर्व खाते संभाजी पाटील निलंगेकरांकडे देण्यात आली आहेत.

हे आहेत कॅबिनेट मंत्री
> राधाकृष्ण विखे पाटील (भाजप): गृहनिर्माण
> जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) : रोजगार हमी व फलोत्पादन
> आशिष शेलार (भाजप) : शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
> संजय कुटे (भाजप): कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण
> सुरेश खाडे (भाजप) : सामाजिक न्याय
> अनिल बोंडे (भाजप): कृषी
> अशोक उईके (भाजप) : आदिवासी विकास
> तानाजी सावंत (शिवसेना) : जलसंधारण
> राम शिंदे (भाजप) : पणन व वस्त्रोद्योग
> संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
> जयकुमार रावल (भाजप) : अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राज शिष्टाचार
> सुभाष देशमुख (भाजप) : सहकार, मदत व पुनर्वसन

हे आहेत राज्यमंत्री
> योगेश सागर (भाजप) : नगरविकास
> अविनाश महातेकर (रिपाइं) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
> संजय भेगडे (भाजप) : कामगार, पर्यावरण, मदत व पुनवर्सन, भूकंप पुनर्वसन
> डॉ. परिणय फुके (भाजप): सा. बां.(सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास
> अतुल सावे (भाजप) : उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ

X
COMMENT