Home | Business | Business Special | expensive mobile phones in the world 

हजारो लाखो नाही तर कोटींत आहे या मोबाइल फोन्सची किंमत; जाणून घ्या कोणते आहे जगातील सर्वात महागडे फोन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:53 AM IST

जगातील सर्वात महागड्या फोनमध्ये तब्बल 500 डायमंड बसवण्यात आले आहे.  

 • expensive mobile phones in the world 

  नवी दिल्ली- सध्या मोबाइल सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे रोजच्या जगण्यात आपण मोबाइलचा सर्रास वापर करत असतो. काही लोकांना महागड्या फोनचा छंद असतो तर काही लोक स्वस्त फोन वापरतात. व्यक्तीच्या आयुष्यात काय सुरू आहे हे आपल्याला फोनच्या माध्यमातून कळते. एकविसाव्या शतकात टेक्नॉलॉजी इतकी अॅडव्हान्स झाली की कॉम्प्युटर आणि मोबाइल फोन यांच्यात फरक करणे अवघड झाले आहे. आता तुमच्या खिशात मावणारा स्मार्टफोन कॉम्प्युटरप्रमाणे सर्व कामे करु शकतो. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही सर्वात महागड्या मोबाइल फोन्सविषयी सांगणार आहोत ज्यांची किंमत कोट्यावधी रुपये आहे.

  डायमंड रोज आयफोन 4, 32GB:

  हा फोन जगातील सर्वात महागडा मोबाइल फोन असून त्याची किंमत जवळपास 52 कोटी 80 लाख रुपये आहे. या फोनच्या कडांवर 100 कॅरेट रोज आणि 500 डायमंड बसवण्यात आले आहे. या फोनचे मागील कव्हर रोज गोल्ड पासून तयार केले असून त्यावर 53 डायमंड बसवण्यात आले आहे. तर फोनच्या मधल्या बटनावर 8 कॅरेटचा डायमंड बसवलेला आहे.

  पुढील स्लाइड्सवर वाचा- जगातील इतर महागड्या फोनविषयी

 • expensive mobile phones in the world 

  सुप्रीम गोल्डस्ट्रीकर आयफोन 3G, 32GB:

  हा फोन जगातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा फोन असून याची किंमत जवळपास 21 कोटी 12 लाख रुपये आहे. या फोनमध्ये 22 कॅरेट गोल्डचा वापर करण्यात आला असून फोनच्या कड्यांवर 53 डायमंड बसवण्यात आले आहे. तर फोनचे नेव्हीगेशन बटन 7.1 कॅरेट गोल्डचे आहे. त्यासोबतच फोनला आकर्षक लुक देण्यासाठी फोनमध्ये कश्मीरी गोल्ड आणि लेदरचा वापर करण्यात आला आहे.
   
  आयफोन 3G किंग्स बटन:  

  हा फोन ऑस्ट्रियापीटर अलॉयस्सनने तयार असून हा 15 कोटी 84 लाखांसह जगातील तिसऱ्या क्रमांकाचा महागडा फोन आहे. या फोनवर 138 डायमंड बसवण्यात आले आहे. तर फोनच्या नेव्हिगेशनबटनवर 6.6 कॅरेटचा सिंगल डायमंड बसवण्यात आला आहे.  
   
  पुढील स्लाइड्सवर वाचा- जगातील इतर महागड्या फोनविषयी
   

 • expensive mobile phones in the world 

  गोल्डविस ले मिलियन:

  या फोनला इमॅन्युल > गेट(Emmanuel Gueit) ने तयार केले असून याला सर्वात आधी स्वित्झर्लंडमध्ये लाँच करण्यात आले होते. 8 कोटी 58 लाख रुपये इतकी या फोनची किंमत असून फोनमध्ये 18 कॅरेटचे पांढरे गोल्ड आणि 20 कॅरेटचा WS1 डायमंड बसवण्यात आला आहे.

   

  डायमंड क्रिप्टो स्मार्टफोन:

  > 8 कोटी 58 लाख किंमत असलेला हा फोन विंडो सीइ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत आहे. या फोनचे खास वैशिष्य म्हणजे यात 10 निळ्या डायमंडसह 58 डायमंड बसवण्यात आले आहे.

Trending