आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Experiences Seen In Kehli Leadership; Aggressive Fielding Against Africa; Now The Need Of The Role Of The Aggressive Batsman

काेहलीच्या नेतृत्वात दिसताेय अनुभव; आफ्रिकेविरुद्ध आक्रमक क्षेत्ररक्षण; मात्र आता स्फाेटक फलंदाजाच्या भूमिकेची गरज!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी नेटवर्क - भारताने विश्वचषकातील  पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयाने आता स्पर्धेतील सहभागी इतर संघांना भारत फायनलमधील प्रवेशाचा प्रबळ दावेदार असल्याचे संकेत मिळाले. शानदार गाेलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या  आफ्रिकेला झटपट राेखले आणि त्यानंतर राेहित शर्माने शानदार शतकाच्या बळावर आवाक्यातले विजयाचे लक्ष्य गाठून दिले. राेहितला  अनेक वेळा जीवनदान मिळाले. याचा फायदा घेत त्याने विजयश्री खेचली.

 

नेतृत्व : नाणेफेकीच्या काैलला कलाटणी 

विराट काेहलीचा करिअरमधील हा तिसरा वर्ल्डकप आहे. मात्र, कर्णधाराच्या भूमिकेत त्याचा हा पहिलाच विश्वचषक आहे. त्याच्यावर स्फाेटक आणि दमदार फलंदाजीशिवाय कुशल नेतृत्व  करण्याची दुहेरी जबाबदारी आहे. त्याने आफ्रिकेविरुद्ध सामन्यात कुशल नेतृत्व सिद्ध केले. नाणेफेक गमावल्यानंतही त्याने क्षेत्ररक्षणात सर्वाेत्कृष्ट कामगिरी केली आणि आफ्रिका संघाला झटपट राेखले. यामुळे टीमला आवाक्यातले टार्गेट सहज गाठता आले आहे. 

 

फलंदाजी : मधली फळी अपयशी, लयीत येण्याची माेठी गरज

टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच मजबूत आहे. मात्र, मधल्या फळीला अद्याप आपली छाप पाडता आली नाही. तरीही आफ्रिकेच्या गाेलंदाजांमुळे भारतीय संघाचे फारसे नुकसान झाले नाही. त्यांनी  शिखर धवन आणि काेहलीला १५ षटकांत बाद केले. मात्र, त्याचा माेठा फायदा आफ्रिकन टीमला झाला नाही. आता या फळीला  कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज  आहे. यासाठी ही फळी लयात येणे गरजेचे आहे. 

 

गाेलंदाजी : वेगवान गाेलंदाज, फिरकीपटूंची भूमिका महत्त्वपूर्ण

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात भारताच्या भुवनेश्वर व बुमराहने गाेलंदाजीची सुरुवात केली. यासह त्यांनी पहिल्याच षटकापासून आफ्रिका संघावर दबाव टाकण्यास सुरुवात करून दिली. बुमराहच्या अॅक्शन आणि वेगाच्या समाेर आफ्रिकेच्या दाेन्ही सलामवीरांना फक्त तीन षटकांपर्यंत आव्हान कायम ठेवता आले. त्यानंतर कुलदीप व यजुवेंद्र चहलने सरस खेळी करत दाणादाण उडवली. 

 

फील्डिंग : कोहली गेम लक्षात घेऊन पाेझिशन बदलल्याने यशस्वी

आफ्रिकेविरुद्ध सामन्यात एखाद्-दाेन वगळता शेवटपर्यंत भारताची फिल्डिंग अधिक आक्रमक हाेती. राेहितने आमलाचा झेल साेडला आणि धाेनीकडून एक धावबाद हुकला. मात्र, त्यानंतर काेहलीने गेम लक्षात घेतला आणि आपली पाेझिशन बदलून टाकली. त्यानंतर लगेच तिसऱ्या स्लिपमध्ये डिकाॅकचा झेल मिळाला. त्याने   टाइट फिल्डिंग करून  माेठ्या धावांचा प्रयत्न हाणून पाडला. 

 

पाठबळ : दक्षिण आशियाई चाहत्यांचे भारताला समर्थन

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यासाठी १७ हजार २०० तिकिटांची खरेदी झाली.  सर्वाधिक चाहते हे भारताला पाठबळ देत हाेते. राेज बाऊलावर सर्वत्र भारताचा तिरंगा फडकत हाेता. चाहत्यांचा जल्लाेषही वाढत हाेता. राेहित व चहलच्या कामगिरीने या जल्लाेषात भर टाकली. 

बातम्या आणखी आहेत...