आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनचा अतिरेक; तरुणाई असहिष्णू: जळगावातील हाणामारीच्या घटनांवर शिक्षणतज्ज्ञांचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शाळा असो कॉलेज असो वा क्लास, कॅन्टीन या सर्व ठिकाणी आजकाल विद्यार्थी, विद्यार्थिनी क्षुल्लक कारणांवरून हमरीतुमरीवर येत भांडायला लागले आहे. तर कधीकधी मारायलादेखील धावून येतात. हे सारं काही स्मार्टफोनमुळे होत आहे. विद्यार्थी स्मार्टफोनचा योग्य कारणासाठी वापर न करता अयोग्य कारणासाठीच अधिक वापर करत असल्याने स्मार्टफोन हे चिंतेचे कारण बनले आहे. या स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात देखील बदल होत असल्याने यावर पालकांनी बंधने घालणे गरजेचे झाले आहे,असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले. 


मोबाइल विज्ञान शाप की वरदान हा शालेय जीवनात असलेला निबंधांचा विषय असला तरी ताे केव्हाही लागू पडताे. अाज मोबाइल ही प्रत्येकाची गरज बनली अाहे. मात्र, त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वाढता वापर, स्मार्टफोनवरील अत्याधुनिक सुविधांमुळे महाविद्यालयीनच नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांच्यादेखील वर्तनात बदल घडून आला आहे. खोटं बोलणे, चुगल्या लावणे, वाईट गोष्टी पसरवणे, प्रेम प्रकरण भडकावणे, वाईट बोलणे, भांडाभांडी करणे आदी गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या आहे. याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी संवाद साधला असता एकमेकांशी संवाद साधून एखाद्या गोष्टीची शहानिशा करण्याचे प्रमाण थांबले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गैरसमज व त्यातूनच मारामारी सारखे प्रकार महाविद्यालयाच्या परिसरात घडून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी हे शिक्षणाचा व जगण्याचा आनंद न घेता यात गुरफटत आहे. याचा परिणाम म्हणून वर्ग खोल्या ओस पडल्या आहे व परिसर गजबजला आहे.


ही घ्या काळजी 
पालकांनी... 

गरज असेल तरच स्मार्टफोन द्या 
दररोज आपल्या पाल्याशी बोला 
पाल्याचा फोन तपासत जा, 
पाल्याच्या वर्तनावर लक्ष ठेवा


विद्यार्थ्यांनी... 
स्मार्टफोनचा योग्य वापर करणे शिका 
कोणत्याही गोष्टीची स्वत: खात्री करा 
एकमेकांशी संवाद साधण्यावर भर द्या 
व्हिडिओ, रेकॉर्डिंग करताना दक्ष राहा


सतर्कता बाळगणेच योग्य
गेल्या महिन्याभरात शहरात हाणामारीच्या घटना ऐकायला मिळाल्या. यात युवक अग्रस्थानी हाेते. केवळ गैरसमजातून हे प्रकार घडत आहे. स्मार्टफोनचा जीवनावर व वर्तनावर परिणाम होणार नाही, याची विद्यार्थी व पालकांनी काळजी घ्यावी. -चंद्रकांत भंडारी, शिक्षणतज्ज्ञ 

बातम्या आणखी आहेत...