आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Experts Suggest Investing In Shares And Mutual Funds Before The Festival Comes In Large Sums.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणाआधी बाेनसची एकगठ्ठा रक्कम हातात येते, ती समभाग आणि म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवण्याचा सल्ला देताहेत तज्ञ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टाॅक मार्केट...
उद्दिष्टानुसार गुंतवणूक पाेर्टफाेलिअाे केल्यास चांगला परतावा मिळू शकताे..
.
नुकताच आपण दसरा साजरा केला. हा असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. आर्थिक नियाेजनाच्या दृष्टीने पाहिल्यास आपण गुंतवणुकीच्या वाईट सवयींपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जाे दीर्घावधीत आपल्या गुंतवणुकीस नुकसान पाेहाेचवू शकतो. अशा काही वाईट सवयी आहेत : १. बाजाराबाबत अंदाज बांधत राहणे, २. गुंतवणुकीबाबत दीर्घ कालावधीसाठी विचार न करणे, ३. एेकीव माहितीवरून गुंतवणूक करणे, ४. नुकत्याच मिळालेल्या चांगल्या परताव्यावर अधिक लक्ष देणे, ५. गुंतवणुकीच्या पाेर्टफाेलियाेत याेग्य अॅसेट अलाेकेशन न करणे आदी बाबी येतात. मात्र, यामध्ये सर्वात वाईट सवय म्हणजे बाजारातील वृद्धीत जास्त परताव्याची लालूच आणि घसरणीदरम्यान जास्त भीती दाखवणे. गुंतवणूकदार अनेकदा आपल्या गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेतात. हे याेग्य नाही. बाजारात कमकुवतपणा किंवा माेठ्या चढ-उतारावेळी बऱ्याचदा तेजीमुळे बाजारातून काढतात किंवा तेजीत घाईत गुंतवणूक वाढवतात.

याेग्य दिशेने पुढे जाण्यातील पहिले पाऊल म्हणजे आपल्या उद्दिष्टानुसार पुढे जात गुंतवणुकीचा पाेर्टफाेलिया तयार करणे हाेय. सर्वात प्रथम हे अाेळखा की, तुमचे वित्तीय लक्ष्य काय आहेॽ चांगला परतावा देऊ शकणारे काेणते समभाग असू शकतात. गुंतवणुकीच्या वाईट सवयींपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही अॅसेट अॅलाेकेशनवर भर द्या. म्हणजे, इक्विटी, डेट गाेल्ड, एफडी आदींच्या विविध माध्यमांतून तुम्हाला किती प्रमाणात गुंतवणूक करायची आहे, यावर लक्ष दिले पाहिजे. गरज पडल्यास वेळाेवेळी यामध्ये बदल करत राहा. शेअर बाजारात अल्पमुदतीत माेठ्या चढ-उताराचा कल दिसू शकताे. अशा स्थितीत गुंतवणूकदाराने दीर्घावधीत गुंतवणूक केली पाहिजे .

वेळोवेळी पोर्टफोलिओचा आढावा घेत जा... 
नियमितपणे आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेणे चांगले असते. ज्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करत आहात त्यांच्या व्यवसायाचे विश्लेषण करून गुंतवणूक बदलून पोर्टफोलिओ संतुलित करत राहिले पाहिजे. तुम्ही जेवढी दीर्घावधीसाठी गुंतवणूक कराल, त्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शक्यता वाढत असते.
- अश्विन पाटणी, हेड-प्राॅडक्ट्स अँड अल्टरनेटिव्हज, अॅक्सिस एएमसी 

म्युच्युअल फंड.... 
बाेनसची रक्कम लिक्विड फंडात गुंतवणे फायदेशीर हाेऊ शकते...
बरेच जण बाेनसला खर्च करणाऱ्या रकमेस डिस्पाेजेबल इनकमच्या रूपात पाहतात. परिणामी, यातील माेठा वाटा महागडे गिफ्ट आणि अनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर खर्च केला जातो. त्याएेवजी स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारणे आणि दीर्घ कालावधीत चांगला परतावा प्राप्त करण्यात बाेनसचा याेग्य उपयाेग करू शकताे.


सुरक्षा आधी, आपल्या आपत्कालीन फंडाचा आढावा घ्या : आपत्कालीन स्थितीत इमर्जन्सी फंड बनवा. यामुळे दुर्घटना, नाेकरी जाणे किंवा व्यावसायिक नुकसानीतून बचाव करण्यासाठी मदत मिळते. या फंडात ४-६ महिन्यांच्या खर्चासमान रक्कम असायला हवी. ज्यांनी आतापर्यंत इमर्जन्सी फंड केला नाही, ते बाेनसच्या रकमेतून इमर्जन्सी फंड स्थापन करू शकतात. अनेकदा गुंतवणूकदार इमर्जन्सी फंड स्थापन करतात. मात्र, ही रक्कम एखाद्या खर्चासाठी वापरली जाते आणि फंडात परत पुरेशी रक्कम घालायला विसरली जाते. अशा गुंतवणूकदारांनी वेळाेवेळी आढावा घेऊन इमर्जन्सी फंडात पुरेशी रक्कम ठेवली पाहिजे. यासाठी त्यांना बाेनसची रक्कम लिक्विड फंड किंवा अन्य कमी अवधीत लिक्विड फंड वा अन्य कमी अवधीच्या फिक्स्ड इन्कम फंडात गुंतवणूक केली पाहिजे.

जास्त पैसे अलाेकेट करणे, वित्तीय लक्ष्य लवकर प्राप्त करा : जेव्हा गुंतवणूक वित्तीय लक्ष्यावर निश्चित करता तेव्हा त्यांना प्राप्त करण्यासाठी एक निश्चित रक्कम, एका निश्चित वेळेत गुंतवणुकीसाठी विविध माध्यमांत गुंतवली पाहिजे. समजा ते आपल्या सध्याच्या गुंतवणुकीत पाेर्टफाेलियाची बाेनस रक्कम जाेडल्यास यामुळे त्यांना वित्तीय उद्दिष्ट लवकर प्राप्त करण्यात मदत मिळू शकते. गुंतवणूकदार हवे तर म्युच्युअल फंडात रक्कम लावून तगडी रक्कम जाेडू शकता.

इक्विटी लिंक्ड स्कीमद्वारे कर वाचवू शकताे
तुम्ही गुंतवणुकीचे नियाेजन लवकर करत असाल तर आर्थिक वर्षाच्या अखेरीस हाेणाऱ्या त्रासापासून वाचू शकता. बाेनसच्या रकमेस इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुम्ही एक प्रकारे कर बचत करू शकता, दुसरीकडे मासिक खर्चांची पूर्तता नियमित वेतनातून करू शकता.
- ताहेर बादशाह, सीआयअाे इक्विटीज, इन्व्हेस्काे 

लेखकांचे हे वैयक्तिक मत आहे, याच्या आधारे गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास दैनिक दिव्य मराठी जबाबदार नसेल.

बातम्या आणखी आहेत...