आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तू एक्स्पायर झालीय? तर करा तक्रार....

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल्ली बरेच पदार्थ हवाबंद पॅकेट्समध्ये मिळतात. रेडी टू कुकसारखे पदार्थ जितके सोयीस्कर, तितकीच त्यांची वैधताही मर्यादित असते. मुख्यत्वे मॉल्समधील सेल किंवा ऑफर्सना भुलून न जाता वस्तूंची एक्स्पायरी डेट जाणीवपूर्वक तपासावी. वस्तूची वैधता संपत आल्यावर, ती वस्तू लवकर विकली जावी यासाठी विक्रेते वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतात. त्यामुळे, एकावर एक मोफत किंवा अर्ध्या किमतीत मिळणाऱ्या वस्तूंवरील एक्स्पायरी डेट ही आवर्जून तपासून घ्यावी. एखाद्या वस्तूवरील वैधता संपल्यावरही, ती विकायला ठेवली असेल तर लगेचच ही बाब दुकानदाराच्या किंवा मॉलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी. वैधता संपलेली वस्तू विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. मॉलमधील कस्टमर केअर विभागाकडे याबाबतची लेखी तक्रार करता येते. तसेच, पॅकेट्सवरील वेष्टनावर त्या त्या कंपन्यांचा ई-मेल आयडी, टोल फ्री क्रमांक किंवा पत्ता छापलेला असतो. तिथेही तक्रार नोंदवता येते. त्या वस्तूचे छायाचित्रही सोबत जोडता येईल. शिवाय खालील पत्त्यावरही  ग्राहक तक्रार नोंदवू शकतात.

नियंत्रक, वैध मापनशास्त्र, प्रशासकीय कुटीर, क्रमांक- ७, फ्री-प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१ 

कोणत्याही वस्तूची खरेदी करताना ती डोळसपणे करावी. अनेक वेळा एक्स्पायरी डेट नेमकी कुठे आहे हेच आपल्याला दिसत नसते. त्यामुळे तुम्ही ती कुठे आहे हे त्या दुकानदारांना विचारून खात्री करून घेणे हेच आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरेल.

बातम्या आणखी आहेत...