आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Explaining The Benefits Of Electric Cars, Vib Went Australia; 89 Thousand Kilometers Cover In 3 Years

इलेक्ट्रिक कारचे फायदे सांगत ऑस्ट्रेलियाला गेले वीब; 3 वर्षांत कापले 89 हजार किलोमीटर अंतर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- इलेक्ट्रिक कारचे फायदे सांगण्यास घराबाहेर पडलेले नेदरलँडचे वीब वेकर हे नुकतेच ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. यासाठी त्यांनी गत ३ वर्षांत ८९ हजार किमी प्रवास केला व त्यात युरोप, मध्य-पूर्व व दक्षिण-पूर्व आशियातील ३३ देशांना भेटी दिल्या. ही कोणतीही साहसी मोहीम नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या लोकांना इलेक्ट्रिक वाहनाचे फायदे सांगणे, हा या प्रवासाचा उद्देश आहे. जीवाश्म इंधनासाठी अशी वाहने एक चांगला पर्याय असल्याचे वीब यांचे मत आहे. 

 

ऑस्ट्रेलियात बहुतांश लोक इलेक्ट्रिक कारला महाग व कामगिरीत चांगले मानत नाहीत. आम्हाला रोज प्रवास करावा लागत असल्याने चार्जिंगवर चालणाऱ्या कार आमच्यासाठी नाहीत, असे ते म्हणतात. ऑस्ट्रेलियन लोकांचा हाच गैरसमज दूर करण्यासाठी वेकर यांनी त्यांच्या २००९ च्या कन्व्हर्टेड फोक्स वॅगन इलेक्ट्रिक कारने अॅडिलेडपर्यंत प्रवास केला. इतका मोठा प्रवास केल्याने मला खूप ‌थकवा येईल, असे वाटले होते; परंतु असे काहीही झाले नाही. त्यामुळेच मी लोकांना इलेक्ट्रिक कारचे फायदे सांगणार आहे, असे वेकर म्हणाले. 

 

मार्गात ठिकठिकाणी थांबून कार केली चार्ज 
या प्रवासासाठी फॉक्स वॅगन ही नंतर इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित केलेली कार निवडली. बाजारात सध्या असलेल्या आधुनिक कार एकदा फुल चार्जिंग केल्यास ५०० किमीपर्यंत धावतात. मात्र, माझी ही कार एकदा चार्ज केल्यास २०० किमीच धावते. त्यामुळे मी मार्गात अनेक ठिकाणी थांबून कार चार्ज केली व प्रवास पूर्ण केला, असेही वेकरनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...