आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : बॉलिवूड सेलेब्रिटींसोबत ड्रग पार्टी केल्याच्या आरोपाबद्दल प्रोड्यूसर-डायरेक्टर करण जोहरने आता स्पष्टीकरण दिले आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, व्हायरल व्हिडीओ बनवण्याच्या 5 मिनिटे अधीपर्यंत त्याची आई हीरू जोहरदेखील पार्टीमध्ये बसलेली होती. कारण म्हणाला, "ही पार्टी फॅमिली आणि सोशल गॅदरिंग सारखी होती, जिथे मित्रमंडळ बसून थोडा चांगला वेळ एकत्र घालवत होते. आम्ही गाणी ऐकत होतो, चांगले अन्न खात होतो आणि आमचे चांगले बोलणे सुरु होते. तिथे दुसरे काही सुरु नव्हते."
शिरोमणी अकाली दलाच्या सिरसा यांनी केला आहे आरोप...
30 जुलैला शिरोमणी अकाली दलाच्या मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून एक व्हिडीओ शेअर करून लिहिले होते, "उडता बॉलीवुड.. कल्पना विरुद्ध वास्तविकता. पाहा बॉलिवूडमधील एक शक्तिशाली वर्ग कसा आपली नशेत अवस्था लोकांना दाखवत आहे."
करण म्हणाला - 'मी मूर्ख नाहीये...'
करण जोहर, सिरसा यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देत म्हणाला, "तिथे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लोक होते, जे आठवडाभराच्या कठीण परिश्रमानंतर थोडा चांगला वेळ घालवत होते. मी तो व्हिडीओ खूप प्रामाणिकपणे शेअर केला. जर तिथे काही दुसरे सुरु असते तर मी मी व्हिडीओ अपलोड केला असता का ? मी मूर्ख नाहीये."
विकी कौशलवरही केले गेले गंभीर आरोप...
व्हिडिओमध्ये विकी कौशल एकदम नशेत दिसत होता. याचे स्पष्टीकरण देत करण म्हणाला, "निश्चितच तुम्हाला तुमचे नाक खाजवण्याची परवानगी आहे. निश्चितच तुम्हाला तुमचा फोन आपल्या मागच्या पॉकेटमध्ये ठेवण्याची परवानगी आहे. प्रकाशाच्या तेजाला एकप्रकारचे पावडर समजले जात आहे." करण पुढे म्हणाला की, विकी त्यावेळी डेंग्यूमधून रिकव्हर होत होता आणि लिंबू घालून गरम पाणी पीत होता."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.