National / पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 21 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या स्फोटात आसपासच्या अनेक इमारती पडल्या, 500 मीटर दूर असलेल्या मॉलचे काचं फुटली

दिव्य मराठी वेब

Sep 04,2019 08:16:22 PM IST

गुरदासपूर(पंजाब)- येथील बटालामध्ये आज(बुधवार) दुपारी एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण विस्फोट झाला. अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात झाला, तेव्हा कारखान्यात 25 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत होते. दरम्यान, माहिती मिळताच पोलिस आणि अग्नशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.


प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की, बटाला-जालंधर रोडवर हंसली परिसरात झालेल्या या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या स्फोटामुळे आसपासच्या अनेक इमारती ढासळल्या. घटनास्थळापासून 500 मीटर दूर असलेल्या मॉलच्या कांच फुटले. अग्निशामक दलाच्या 10 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


घटनास्थळी एसएसपी उपिंदरजीत सिंग घुम्मन पोहचले असून, त्यांनी सांगितले की, हा कारखाना रहिवासी परिसरात होता. दुपारी अंदाजे 3 वाजून 42 मिनीटावर हा स्फोट झाला. या स्फोटात कारखान्याची इमारत पूर्णपणे ढासाळली आहे. या स्फोटामुळे कारखान्याबाहेरील गाड्याही उडून दूरवर पडल्या आहेत.

X
COMMENT