आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या यीमा शहरात गॅस प्लँटमध्ये स्फोट; 10 जणांचा मृत्यू, 3 किमी दूरवरील घराच्या काचा फुटल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या हेनान प्रांतातील यीमा शहरात शुक्रवारी एका गॅस प्लँटमध्ये स्फोट झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा स्फोट शुक्रवारी स्थानीक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता झाला. ही घटना घडल्यापासून 5 लोक बेपत्ता आहेत, त्यांच्याबद्दल अद्याप काहीच माहिती मिळाली नाहीये.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पोट टाक्यातील ज्वलनशील पदार्थामुळे झाला नाही, पण खुप जोरदार धमाका झाला असल्याचे स्थानीकांचे मत आहे. या स्फोटामुळे 3 किलोमीटर दूरवरील घराच्या काचा फुटल्या. प्रतक्षदर्शींनी सांगितले की, प्लँटमध्ये पाहता-पाहता आग वाढली आणि सगळीकडे धुर पसरला.


 

यीमा गॅस प्लँट सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगला होता. ही चीनची पहिलीच फॅक्टरी होती, ज्याला चीनकडून चांगल्या गुणांमुळे सर्टिफाय करण्यात आले होते. तुर्तास घटना कशामुळे घडली याची माहिती मिळू शकली नाहीये. प्लँटमध्ये अंदाजे 1200 कर्मचारी काम करतात.

 

केमिकल प्लँट स्फोटात 60 जणांचा जीव गेला
याच वर्षी मार्चमध्ये जिआंग्सू प्रांतात केमिकल प्लँटमध्ये स्फोट होऊन 60 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पण, चीनमध्ये सगळ्यात वाईट औद्योगिक अपघात 2015 मध्ये झाला होता. तियानजिनमध्ये एका केमिकल वेअरहाउसमध्ये आग लागून 173 लोक मारले गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...