आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्सासमध्ये लहान मुलांचे शोषण करणाऱ्या 300 पाद्रींचा पर्दाफाश 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया राज्यानंतर आता टेक्सासमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ३०० पादरी तपास यंत्रणेच्या रडार आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पाद्रींचा टेक्सासच्या १५ कॅथॉलिक डायोसिसने पर्दाफाश केला आहे. या डायोसिसने गुरूवारी या पादरींची नावे ऑनलाईन चव्हाट्यावर आणली. 

 

अमेरिकेत कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्सचे अध्यक्ष कार्डिनल डॅनियल डिनार्डो म्हणाले, अत्याचार प्रकरणातील अनेक आरोपी पादरींचा तपास १९५० पासून सुरू आहे. अनेक आरोपींचा मृत्यूही झालाय. टेक्सासमध्ये ८५ लाख कॅथॉलिक आहेत. हे प्रमाण टेक्सासच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के एवढे आहे. आॅगस्टमध्ये पेन्सिल्व्हेनियामध्ये ३०० पादरींवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा लावण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेतील विविध राज्यांच्या प्रशासनाने चर्चच्या तपासाला वेग आणला होता. 

 

७० वर्षांपासूनची प्रकरणे : काही पाद्रींवर केस, काही आरोपी हयातही नाहीत 
अमेरिकेत कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्सचे अध्यक्ष कार्डिनल डॅनियल डिनार्डो म्हणाले, मुलांचे शोषण करणाऱ्या पादरींना अनेक लोकांनी मदत केली आहे. अनेकांनी दोषी पादरींचा बचावही केला आहे. अशा सर्वांची नावे चव्हाट्यावर आणली जातील. दोषींची नावे जाहीर करण्याचा निर्णय टेक्सासच्या अनेक बिशपनी घेतला होता. ही नावे जाहीर करून पीडितांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीडितांचे दु:खाची देवाण-घेवाण करता येऊ शकेल. हे क्लेशदायी आहे. कारण दोषींना शिक्षा झालेली नाही.


पेन्सिल्व्हेनियामध्ये ३०० पाद्रींवर मुलांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या पेन्साल्व्हिनिया प्रांतात ३०० पादरींवर लहान मुलांवरील लैंगिक शोषणाचे आरोप होते. पेन्सिल्व्हिनियाचे अॅटोर्नी जनरल जोश शापिरो यांनी दोन वर्षा नंतर १४०० पानांचा अहवाल तयार केला होता. त्यात पादरींची नावे होती. शोषणाची ही प्रकरणे ७० वर्षांपासून सुरू आहेत.

 

भारतात दोन वर्षांत पाद्रींच्या शोषणाची तीन मोठी प्रकरणे उजेडात आली
भारतात गेल्या वर्षी जुलैमध्ये केरळ येथील चर्चच्या चार पाद्रींवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ऑगस्टमध्ये पंजाबच्या जालंधर चर्चच्या बिशपवरही १४ वेळा अत्याचार केल्याचा आरोप एका ननने केला होता. २०१७ मध्ये पाटण्यात दोन महिलांवरील अत्याचार प्रकरणात एका पादरीला अटक झाली होती.

 

बातम्या आणखी आहेत...