आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद वीरांच्या आप्तस्वकीयांना 'लढा'चे नमन, शहिदांच्या आई वडिलांचे पाय धुऊन कृतज्ञता व्यक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तिवसा तालुका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित होवून तालुक्यातील अनेक तरुण देशरक्षणासाठी सीमेवर तैनात होते व आजही आहेत. दरम्यान, तालुक्यातील पाच जवान भारतमातेच्या रक्षणार्थ शहीद झाले आहे. याच शहीद वीरांना स्मरण करण्यासाठी आणि शहिदांच्या माता पिता, भाऊ यांचे पाय धुवून शाहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लढा संघटनेने १५ ऑगस्टला शहीद नमन फेरीचे आयोजन केले होते. या फेरीत सहभागी युवकांनी तालुक्यातील पाचही शहीदांच्या घरी जावून त्यांचे आई, वडील आणि आप्तस्वकीयांचे पाय धुऊन शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

लढा संघटनेचे संजय देशमुख व त्यांच्या समवेत शेकडो तरुण १५ ऑगस्टला तालुक्यातील शिवणगाव येथील शहीद गणेश नेमाडे, शेंदोळा बु. येथील शहीद मदनसिंग शाहू चौव्हान, वऱ्हा येथील शहीद कृष्णा समरीत, कुऱ्हा येथील शहीद रमेशचंद्र जांगडे आणि तिवसा येथील शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या घरी पोहोचले. यावेळी प्रत्येक गावात शहीदांचे स्मारक आहे, त्या स्मारकांचे पूजन करून शहीदांच्या आप्तस्वकीयांचा पाय धूवून, त्यांना शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. हा सन्मान स्वीकरताना अत्यंत भावपूर्ण वातावरण झाले आणि उपस्थित सर्व गहिवरले होते. या रॅलीत तालुक्यातील शेकडो तरुण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. तरुणांनी राबवलेल्या या उपक्रमाचे तिवसा तालुक्यात कौतुक होत आहे.

 

देशासाठी काम करणारी पिढी निर्माण व्हावी
देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांच्या माता पित्याचे ऋण कधीही फिटणारे अमूल्य आहे. आपण फेडूच शकत नाही. मात्र पुढच्या पिढीतही देशाभिमानाची ज्योत तेवत राहावी व देशासाठी काम करणारी पिढी निर्माण व्हावी, याच भावनेतून फेरी काढणे व शहिदांच्या आप्तस्वकियांच्या सन्मान करण्यामागे आहे.
- संजय देशमुख, लढा संघटना.

बातम्या आणखी आहेत...