आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जात वैधता’ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली. अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग हा पदवी अभ्यासक्रम व एमबीए-एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. 


नीट व सीईटीद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र देणे सक्तीचे केले आहे. आधी १० ऑगस्टपर्यंत मुदत होती. मात्र, कर्मचारी संपामुळे जात पडताळणीचे काम प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...