Home | International | Other Country | External Affairs Minister Julie Bishop resigns

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांचा राजीनामा; पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने उचलले पाऊल

वृत्तसंस्था | Update - Aug 27, 2018, 09:11 AM IST

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

  • External Affairs Minister Julie Bishop resigns

    सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. स्कॉट मॉरिसन यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर दोन दिवसांनीच त्यांनी राजीनामा दिला आहे. मॉरिसन हे मावळत्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यांची माल्कम टर्नबुल यांच्या जागी निवड झाली आहे. टर्नबुल यांच्या सहकारी असलेल्या ज्युली बिशप याही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत होत्या, पण त्या पहिल्या टप्प्यातच बाहेर पडल्या होत्या. टर्नबुल यांचे जवळचेे सहकारी असलेल्या मॉरिसन यांची दोन दिवसांपूर्वीच सत्ताधारी लेबर पार्टीच्या नेतेपदी निवड झाली होती. त्यांनी नेतेपदाची ही लढत ४५ विरुद्ध ४० अशा मताधिक्याने जिंकली होती.


    ज्युली बिशप यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पुढील वर्षी मे महिन्यात होणारी संसदीय निवड लढवण्याबाबत मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या मी एक संसद सदस्य म्हणून संसदेत बसेन आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या लोकांसाठी काम करत राहीन. ज्युली बिशप यांच्या निवडणूक लढण्यासंबंधीच्या निर्णयाने मॉरिसन यांच्या सरकारवर गंभीर परिणाम होईल कारण हे सरकार फक्त एक मताच्या फरकाने स्थापन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Trending