आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दिल्लीमध्ये रामनाथ गोयंका मेमोरियल व्याख्यानाला संबोधित करताना देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादाचा व्यापार बनवला आहे. भारतावर दबाव टाकण्यासाठी ते आपली जमीन दहशतवाद्यांना देत आहेत. याचे उत्तर देणे आता गरजेचे आहे. पुढे ते म्हणाले की, 1972 मध्ये झालेल्या शिमला करारामुळे पाकिस्तानात विद्रोह आणि जम्मू-काश्मीरमध्ये समस्या वाढल्या.
पुढे ते म्हणाले की, "आम्ही पाकिस्तानशी तेव्हाच चर्चा करू, जेव्हा ते सीमेवरील दहशतवादाला लगाम लावतील. जागतिक मंचावर भारताची स्थिती एकेकाळी खूप चांगली होती, पण 1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धामुळे खूप नुकसान पोहचले. त्यानंतर पाकिस्तानसोबत 1965 चे युद्ध झाले. तो भारतासाठी खूप वाईट काळ होता."
लोकांनी जयशंकर यांच्याशी अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले
कार्यक्रमात जयशंकर यांच्याशी चीन, क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी(आरसीईपी), कलम 370 आणि नॅशनल रजिस्टर सिटिजन्स (एनआरसी)वर प्रश्न विचारले. भारताने आरसीईपीसोबत न जुडल्यावरही अनेकांनी प्रश्न केले. त्यावर जयशंकर म्हणाले की, खराब करार करण्यापेक्षा कोणताच करार न केलें बरं.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.