Home | National | Gujarat | Extra marital affair in Ahmadabad news

रात्रपाळीचे काम सांगून पत्नीसोबत दिवसा, तर दुसरीसोबत रात्री राहायचा

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 17, 2019, 10:49 AM IST

गुजरातच्या अहमदाबादचे प्रकरण, गुन्हा दाखल

  • Extra marital affair in Ahmadabad news


    अहमदाबाद-गुजरातच्या अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका तरुणाने ९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. घरच्यांना ही माहिती समजली. त्यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यांनी सामाजिक रीतिरिवाजानुसार त्याचे दुसरे लग्न लावून दिले. कुटुंबाच्या दबावामुळे तरुणाने दोन्ही पत्नींसोबत संसार सुरूच ठेवला. मात्र, दुसऱ्या पत्नीला याची कल्पना नव्हती. तिला नुकतीच ही भानगड समजली. तिने महिला हेल्पलाइन -१८१ वर संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर सर्व घटनाक्रम समोर आला. तरुणाने २०११ मध्ये प्रेमविवाह केला होता. तेव्हा दोघींनी सांगितले, पती एकीकडे दिवसा, तर दुसरीकडे रात्री राहत होता. मला रात्रपाळीचे काम असते, असे तो सांगायचा. काही दिवसानंतर त्याचे सर्व बिंग फुटले.

    सासरचे म्हणाले, तुला हवी ती कारवाई कर
    दुसऱ्या पत्नीने सांगितले, १५ दिवसांपूर्वी बाजारात गेले असता फेसबुकवर पाहिलेली मुलगी भेटली. मी तिला पतीचा फोटाे दाखवला व हा तुझा कोण? असे विचारले. तेव्हा ती म्हणाली, हा माझा नवरा आहे. मी सासरी पतीची भानगड सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तुला हवी ती कारवाई करू शकतेस. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. तेव्हापासून पती घरी आलाच नाही.

Trending