आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादच्या १२, लातूरच्या १० मंडळांत अतिवृष्टी; लातुरात भिंत कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने नळदुर्गच्या किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरू झाला आहे. - Divya Marathi
तुळजापूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने नळदुर्गच्या किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरू झाला आहे.

औरंगाबाद  | मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ तर लातूर जिल्ह्यातील १० मंडळांत अतिवृष्टी (६४.५ मिमीपेक्षा जास्त पाऊस) झाली.  नांदेड, बीड, जालना, परभणी, औरंगाबादसह हिंगाेली जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जालना व बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील बेंबळी, केशेगाव, सावरगाव जळकोट, मंगरूळ, सलगरा, मुरूम, दाळिंब, लोहारा, माकणी आणि जेवळी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. 
 

लातुरात भिंत कोसळून बाप-लेकाचा मृत्यू
जळकोट (जि. लातूर) तालुक्यातील घोणसी मंडळात १९९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १० मंडळांत अतिवृष्टी झाली. वाढवणा (ता. उदगीर) येथे राम शिवाजी शिंदे  व त्यांचा मुलगा सचिन यांचा शेजारील घराची भिंत पडून मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...