थंडीने गोठले जगातील / थंडीने गोठले जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र; तापमान -70 अंश सेल्सिअस! नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना

Jan 31,2019 11:00:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेत थंडीमुळे 10 राज्यातील परिस्थिती अतिशय वाइट बनली आहे. अनेक राज्यांमध्ये नद्या पूर्णपणे बर्फ झाल्या. देशात सरासरी तापमान शून्यापेक्षा 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. तर येत्या काही तासांत रक्त गोठवणारी उणे 70 अंश सेल्सिअस थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बाहेर फिरणाऱ्या लोकांना तसेच प्रामुख्याने बेघर लोकांना वाचवण्यासाठी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन दल पेट्रोलिंग करत आहेत. सोबतच, नागरिकांना काम आवश्यक नसेल तर घरीच राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


शरीराचा एक इंच भागही उघडा ठेवू नका
अमेरिकेतील इलिनॉय, आयोवा, मिनिसोटा, नॉर्थ डॅकोटा, साउथ डकोटा, विसकोन्सिन, कन्सास, मिसोरी आणि मोन्टाना येथे सर्वात जास्त थंडी आहे. यापैकी 6 राज्यांमध्ये पोस्टल सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या जात आहेत. राष्ट्रीय हवामान विभागाने केलेल्या ट्वीटनुसार, "परिस्थिती अतिशय विकट बनली आहे. आपण बाहेर असाल तर पूर्ण अंगभर गरम कपडे घाला. शरीराचा एक इंचही भाग उघडा असेल तर त्या ठिकाणी फ्रॉस्ट बाइट अर्थात शीतदंश बसण्याचा धोका आहे. येत्या काही तासांत तापमान -70 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरू शकतो. त्यामुळे, नागरिकांनी घरातच राहणे सर्वोत्तम राहील.''


एका पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या ट्वीटनुसार, "मोकळ्या ठिकाणी थंडीमुळे दृश्यता खूपच कमी झाली आहे. दिवसा प्रवास करत असाल तरीही कारचे हेडलाइट नेहमीच ऑन ठेवा. सुरक्षेचा उपाय म्हणून हेच चांगले राहील." तर दुसरीकडे, खराब हवामानामुळे अमेरिकेत 2700 फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी 1500 विमान तर एकट्या शिकागो प्रांतात उतरणार होते. शिकागोतील परिस्थिती देशात सर्वात वाइट आहे. या ठिकाणी कमाल तापमान -27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. नॉर्थ डॅकोटा प्रांतातील पोलिसांनी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत.

X