आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळे लाल होण्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका, तत्काळ डॉक्टरांना दाखवा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फक्त राग आणि रडल्यामुळेच डोळे लाल होतात असे नाही. यामागे एखादा गंभीर आजारही असू शकताे. वारंवार अनेक वेळा डोळे लाल होत असतील तसेच इरिटेशन, जळजळ, पाणी येण्यासारखी समस्या होत असेल तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा... 


1. कॉर्नियल अल्सर 
डोळ्यांच्या मधोमध लहान गोल आकाराला कॉर्निया म्हणतात. यावर एखादी जखम झाल्यास डोळे लाल होऊ शकतात. 


2. ग्लुकोमा 
या आजारात डोळ्यांवरील ताण (इंट्राऑक्युलर प्रेशर) वाढते. यामुळे डोळे लाल होऊ शकतात. 


3. आयरायटिस 
डोळ्यांमध्ये कॉर्नियाच्या मागे आयरिस असतो. यामध्ये सूज येण्याला आयरायटिस म्हणतात. यामुळे डोळे लाल होऊ शकतात. 


4. स्क्लेरायटिस 
या आजारात डोळ्याच्या पांढऱ्या भागाची एखादी जागा लाल होऊ शकते. आर्थरायटिस, टीबीसारख्या पेशंटमध्ये हे संकेत जास्त असतात. 


5. कंजक्टिवायटिस 
व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कंजक्टिवायटिस म्हणजेच डोळे येण्याची समस्या होऊ शकते. यामुळे डोळे लाल होऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...