Home | National | Madhya Pradesh | Eye Hospital's PRO Shashikant Birthar committed suicide in Madhya Pradesh's Ujjain

आय हॉस्पिटलच्या PRO ने पत्नी आणि मुलांसमोर स्वत:वर बंदुकीने गोळ्या झाडल्या, सुसाइड नोटमध्ये आपल्या मेहुणीला आत्महत्येस कारणीभुत ठरवले...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2019, 04:20 PM IST

लिहीले- मी खूप दुखी आहे, तीन वर्षांपासून पत्नी आणि मुले वेगळे राहतात, हे तिच्यामुळे झाले आहे

  • Eye Hospital's PRO Shashikant Birthar committed suicide in Madhya Pradesh's Ujjain

    उज्जैन(मध्यप्रदेश)- फ्रीगंजमधील खासगी आय हॉस्पिटलच्या पीआरओ शशिकांत बिरथरे(54)ने शनिवारी सकाळी 3.15 वाजता पत्नी आणि मुलांसमोर स्वत:वर गोळ्या झाडल्या. गोळी झाडल्यानंतर घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. बिरथरे यांचा त्यांच्या पत्नीसोबत वाद सुरू होता, त्यामुळेच मागील तीन वर्षांपासून ते आपल्या पत्नी आणि मुलांपासून महेश नगरमधील एका घरात वेगळे राहत होते. पोलिसांनी सांगितले की, बंदुक लायसेंस आहे आणि बिरथरे यांच्या वडिलांची आहे.


    शशिकांत रात्री नशेमध्ये वसंत विहार येथे आपल्या पत्नीच्या घरी गेले. खिडकीतून पत्नी सुनीताला आवाज देऊन बाहेर येण्यास सांगितले. वडिलांचा आवाज ऐकून 20 वर्षीय मुलगा वेदांत आणि मुलगी कल्पश्रीपण बाहेर आले. ते बाहेर येताच शशिकांत यांनी आपल्या छातीवर बंदुक लावून गोळी झाडली. हे दृष्य पाहून पत्नी आणि मुले घाबरले, त्यांनी पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नानाखेडा टी.आय. सतनामसिंह, एफ.एस.एल. अधिकारी डॉ.प्रिती गायकवाड़, ए.एस.पी. नीरज पांडे घटनास्थळी आले. शशिकांत यांच्या खिशातून सुसाइड नोट मिळाली. ए.एस.पी. पांडे यांनी सांगितले की, सुसाइड नोटमध्ये पत्नी आणि सासरच्या लोकांवर आरोप करण्यात आले आहेत.


    सुसाइड नोटमध्ये मेहूणीला धरले जबाबदार
    ''मी खूप दुखी आहे, तीन वर्षांपासून पत्नी आणि मुले वेगळे राहतात. हे सगळे माझ्या मेहुणा आणि मेहूणीमुळे झाले आहे. त्यांना कधीच माफ नाही करणार, माझ्या मृत्यूस फक्त तेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी- शशिकांत बिरथरे''


Trending