आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर अपघात : प्रत्यक्षदर्शी म्हणाले-सगळीकडेल मृतदेहच पडलेले होते, ते पाहून फाळणीच्या काळाची झाली आठवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - शहरातील जोडा बाजार येथील रावण दहन पाहणाऱ्या लोकांना शुक्रवारी दोन रेल्वेंनी चिरडले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर रेल्वे पटऱ्यांवर 150 मीटर परिसरात मृतदेहच पडलेले होते. ते पाहून 1947 च्या फाळणीचा काळ आठवला. 


परवानगी नव्हती
> एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला, रेल्वे ट्रॅकजवळ बॅरिकेडिंग नव्हती. अपघातानंतरचे दृश्य पाहावत नव्हते. सगळीकडे रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह होते. 
> दुसऱ्या एखाने म्हटले, पटरीपासून अवघ्या 200 फुटांवर रावण दहन केले जात होते. कार्यक्रमाला परवानगीही नव्हती. 
> एकाने सांगितले की, सगळीकडून फक्त रडणाऱ्यांचा आक्रोश ऐकू येत होता. लोक फक्त नातेवाइकांचे मृतदेहच शोधत होते. 
> आणखी एक प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, कार्यक्रम पाहता प्रशासनाने क्रॉसिगवर अलार्मची व्यवस्था करायला हवी होती. त्याशिवाय रेल्वे थांबवण्याची किंवा स्पीड कमी करण्याची व्यवस्था हवी होती. 

 

मदतीला कोणीच आले नाही
मृतांचा आकडा 200 पर्यंतही जाऊ शकतो असे प्रत्यक्षदर्शी म्हणाले. अपघातानंतर प्रशासन लगेच मदतीसाठी पोहोचले नाही. ज्यांनी मुले गमावली त्या मातांचे आता काय होणार. अनेक मुले महिलांचा मृत्यू झालाय.  

 

बातम्या आणखी आहेत...