आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरण बांधण्यासाठी 610 वर्षे जुन्या, तब्बल 4600 टन वजनाच्या मशिदीची शिफ्टिंग, 300 चाकांच्या रोबोटिक ट्रान्सपोर्टरची घेतली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्तांबुल. तुर्कीमध्ये चौथे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी जवळपास 610 वर्षे प्राचिन मशिदीला रोबेटिक व्हील्सच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात येणार आहे. तुर्कीच्या हुर्रियत डेली वृत्तपत्रानुसार, हे मस्जिद हसनकैफ शहरात आहे. येथे बाइजान्टाइन किल्ला आणि ईसाई आणि मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळांचे अवशेष असणा-या 6000 गुहा आहेत.

 

हसनकैफ शहराचे मेयर अब्दुलवहाप हुसैन यांनी सांगितले की, पुराच्या पाण्यामुळे ऐतिहासिक इमारती खराब होऊ नये, यामुळे त्यांना दूस-या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत आहे. बांध बांधण्यात येणार असल्यामुळे ऐतिहासिक शहर बुडणार आहे. 1981 मध्ये याला संरक्षित शहरांच्या सूचीमध्ये ठेवण्यात आले होते. 


व्हिडिओमध्ये पाहा कशी झाली शिफ्टिंग - 

बातम्या आणखी आहेत...