आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

275 किमी वेगाने धावत होती कार; अचानक सुटले स्टेअरींगचे नियंत्रण, काही सेकंदात हवेत उसळून प्रेक्षक गॅलरीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकाउ- फॉर्म्युला थ्री मकाउ ग्रँड प्रीवेळी व्हॅन एमर्सफोर्ट रेसिंग टीममधील 17 वर्षीय ड्रायव्हर सोफिया फ्लोर्श ही एका अपघाताची शिकार झाली. अपघातात तिच्या पाठीच्या कण्याचे हाड मोडले आहे. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

 

दुर्घटनेत पाच लोक जखमी

> सुत्रांनी सांगितल्यानूसार दुर्घटनेवेळी सोफियाच्या कारचा वेग जवळपास 275 किलोमीटर प्रति तास होता. सोळाव्या क्रमांकावरून रेसची सुरूवात करणाऱ्या सोफियाचे एका वळणाच्या ठिकाणी कारच्या स्टेअरिंगरवरून नियंत्रण सुटले आणि तिची कार दुभाजकाच्या भिंतीला धडकली. कारच्या प्रचंडवेगामूळे कार दुर्घटनेनंतर हवेत उसळून प्रेक्षक गॅलरीत पडली. या दुर्घटनेत सोफियाव्यतीरिक्त जपानचे चालक शो त्सुबोई, एक मार्शल आणि दोन फोटोग्राफर जखमी झाले आहे.

 

सोफियाने अधिकाऱ्यांचे मानले आभार 

> सोफियाने ट्वीटमध्ये लिहले की, 'माझी प्रकृती स्थिर असुन उद्या सकाळी सर्जरी होणार आहे.' दुर्घटनेनंतर तिला मदत करणारे एफआयए, हवाग टीम, मर्सडीज एएमजीएफ-1 यांचे तिने आभार व्यक्त केले आहे.

 

ब्रिटिश ड्रायव्हर डॅनने जिंकली रेस

> ब्रिटेनच्या रेडबुल जुनियर टीमचा ड्रायव्हर डॅन टिकटुम (वय19) याने ही रेस जिंकली. मकाउ ग्रँड प्रिक्सच्या आयोजकांनी सांगितले की, दुर्घटनेत जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

आतापर्यंत तीन लोकांनी गमवला प्राण

> मकाउ ग्रँड प्रिक्स सर्किट या स्पर्धेच्या मागील सत्रांच्या रेसमध्ये आतापर्यंत तीन लोकांनी प्राण गमवला आहे.  गतवर्षी मकाउ ग्रँड प्रिक्स फीचर मोटरसायकल रेसच्या दरम्यान ब्रिटिश रायडर डॅनिअल हेगार्टी, 2012 मध्ये पोर्तुगालचे लुईस करेरिया आणि हाँगकाँगचे फिलिप याऊ यांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...