आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहऱ्याच्या योगाने आयुष्य करा तणावमुक्त अन् राहा आनंदी... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोक योगा व निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात. मात्र, चेहऱ्याला निरोगी व चांगले ठेवण्याचा फेस योगा हा उत्तम मार्ग आहे. पूर्ण शरीराची काळजी घेताना आपल्याला चेहऱ्याचादेखील विचार करणे जरुरीचे असते. शरीर आतून खराब असेल तर त्याचा प्रथम परिणाम चेहऱ्यावर दिसून येत असतो. आपल्याला तणाव असल्यास तो चेहऱ्यावरून कळून येतो. म्हणूनच शरीराच्या इतर योगाप्रमाणेच फेस योगा हा फायदेशीर ठरतो. फेस योगा ऑफिसमध्येही करता येतो. याकरिता कोणत्याही योगा मॅटची गरज नाही. 


तज्ज्ञांच्या मते शरीराप्रमाणेच चेहऱ्यालादेखील सुदृढ ठेवणे गरजेचे असते. हे लोकांना कळल्याने चेहऱ्याला चांगले ठेवण्यावर ते भर देत आहेत. रोज चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे व्यायाम केल्यास ते फायदेशीर ठरते. फेस योगा चेहऱ्यावरील मांसपेशींना मजबूत बनवतो. त्याचसोबत त्वचा तजेलदार करण्यासाठीदेखील तो उपयोगी ठरतो. तणाव, काळजीमुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग, सुरकुत्या निघून जातात. त्यामुळे चेहरा हा तणावमुक्त दिसतो. चेहऱ्यासाठी ज्याप्रमाणे वॉटर थेरपी चांगली असते, तसेच फेस योगासुद्धा बहुपयोगी आहे. अनेक आजारांवर उपयोगी पडणारा हा व्यायाम आहे. 


फेस योगाचे प्रकार 
सॅश माऊथ एक्सरसाइज
: आरामाच्या मुद्रेत बसावे. श्वासवर घेत प्रथम उजव्या बाजूचा गाल फुगवावा आणि नंतर डावा गाल फुगवावा. वीस वेळा ही प्रक्रिया करावी. दोन्ही बाजूंनी हे करावे. 


इन्व्हर्टेड पोज : उभे राहून दोन्ही पायांत अंतर घ्यावे. श्वास खेचत समोरील बाजूस वाकावे. दोन्ही हातांतील अंगठा आणि मधले बोट हनुवटीवर ठेवावे. 5 ते 10 सेकंदांपर्यंत ही प्रक्रिया करावी. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. दिवसातून दहा वेळेस हा व्यायाम करावा. 
दशरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोक योगा व निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात. मात्र, चेहऱ्याला निरोगी व चांगले ठेवण्याचा फेस योगा हा उत्तम मार्ग आहे. 


स्मायलिंग फिश फेस : आराम मुद्रेमध्ये बसून चेहऱ्याला माशाप्रमाणे बनवावे. ओठांना खालील बाजूस ताणावे. नंतर गालांमध्ये ताणासारखे जाणवेल. त्यामुळे गालांमधील सगळ्या मांसपेशी टोन अप होतात. 


लाफिंग आऊट-लाऊड फेस : जमिनीवर सरळ बसावे. हसता हसता दोघा हातांच्या बोटांना हनुवटीच्या खाली ठेवावे. जोर देत गालांवर दाबावे. या अवस्थेत 5 ते 10 मिनिटांपर्यंत थांबावे. त्यामुळे गाल प्रफुल्लित दिसतात आणि चेहऱ्यावरील तणाव नाहीसा होतो. 

बातम्या आणखी आहेत...