आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने पत्नीसाठी तयार केला स्लीप बॉक्स: जेणेकरून तिला रात्रभर आरामात झोपता येईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूयॉर्क - फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने पत्नी प्रिसिला चानला रात्रभर शांत झोप लागावी यासाठी एक चमकदार स्लीप बॉक्स तयार केला आहे. मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्टद्वार ही माहिती दिली. तो म्हणाला की, प्रिसिलाला रोज सकाळी मुलांसाठी उठावे लागते. यामुळे ती रात्रभर सतत फोन तपासत होती. यामुळे तिची झोप पूर्ण होत नव्हती. पण आता माझा स्लीप बॉक्स तिची मदत करेल. बॉक्स सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान चमकतो. 

 

झुकरबर्गने सांगितले की, या प्रकाशामुळे तिला समजेल की, आता आमच्यापैकी एकाने उठून मुलांना तयार करायचे आहे. सोबतच या बॉक्सचा प्रकाश इतका मध्यम आहे की, यामुळे कोणाचीही झोपमोड होणार नाही. 


अपेक्षेपेक्षा चांगले काम करत आहे बॉक्स

झुकरबर्गने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'आतापर्यंत हा बॉक्स अपेक्षेपेक्षप्रमाणे काम करत आहे. यामुळे प्रिसिला आता रात्रभर झोपू शकत आहे. एका इंजीनियरच्या नात्याने माझ्या साथीदाराचे आभार मानण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा माझ्यासाठी चांगला मार्ग आहे.' 

 

काहींनी केले कौतुक तर काहींनी उडवली खिल्ली 
झुकरबर्गच्या या नवीन शोधाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण याचे कौतुक करत आहेत तर काहींनी या बॉक्सची खिल्ली उडवली आहे.  फेसबुकवरील नक्षलवादी सामग्रीवर ताबा मिळवता येईल असा एखादा अल्गोरिदम झुकरबर्ग तयार करतील का? अशी खोजक टीका ब्रिटिश गायिका लिली एलनने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...