आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Facebook Friend Forced Girl To Change Her Religion In UP And After Marriage Gangrepd Her

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीचा धर्म परिवर्तन करून केले लग्न, नंतर घरच्यांनीच केला सामुहिक बलात्कार; फेसबुकवर झाली होती मैत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


श्रीगंगानगर : येथे प्रथमच लव-जिहादचे प्रकरण समोर आले आहे. एका युवतीसोबत फेसबुकवर मैत्री केली आणि मग जबरदस्तीने धर्म परिवर्तन करून तिच्यासोबत लग्न करण्यात आले. इतकेच नाही तर कित्येक दिवस तिच्यावर सामुहिक बलात्कार देखील करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी युवतीची सुटका करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडून खंडणी घेण्यात आली. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर 4 महिन्यानंतर परत आलेल्या युवतीने गुरूवारी एसपी योगेश यादव यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. एसपीने दिलेल्या आदेशानुसार महिला पोलिसांनी मेरठ येथील आरोपींविरूद्ध अपहरण, सामुहिक बलात्कार, जबरदस्ती धर्म परिवर्तन करणे, खंडणी वसूल करणे आणि आयटी कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

धर्म परिवर्तन करत केला सामुहिक बलात्कार 

पीडिताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, "मी फेसबुकचा वापर करते. एक दिवस मेरठ येथील मोहम्मद शाहनवाज याने खोट्या नावाने आपले फेसबुक अकाउंट तयार केले आणि माझ्यासोबत मैत्री करून माझ्यासोबत चॅटिंग करण्यास सुरूवात केली. युवकाने युवतीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, तर मी ती स्विकार केली. चॅटिंग करताना युवकाने माझा फोटो मागितला. यानंतर 17 ऑगस्ट रोजी श्रीगंगानगर येथील एका हॉटेलमध्ये रूम घेऊन मला भेटण्यासाठी बोलविले. ती मुलगी असल्याचे समजत मी त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. रूममध्ये गेल्यावर मला एकदम धक्काच बसला. कारण आतमध्ये मुलगी नाही तर शाहनवाज नावाचा मुलगा होता. मी त्याला विचारपूस केली असता. मीच तुझ्याशी चॅटिंग करत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर माझ्याशी लग्न करण्याची जिद्द करत प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यानंतर मला घाबरवून आपल्या सोबत उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घेऊन गेला. तेथे त्याचे इतर नातेवाईकही उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबीयांनी मला एका खोलीत बंद केले. सर्वजण धर्म परिवर्तन करून शाहनवाज सोबत विवाह करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत होते. त्यांनी माझे दागिने देखील त्यांच्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रत्येक जण माझ्यावर बलात्कार करत होते. कित्येक माझ्यावर सामुहिक बलात्कार सुरुच होता. माझ्या कुटुंबीयांना फोन करून मला जीवे मारण्याची धमकी देत आत्महत्या केल्याचे सांगत मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती. माझे माइंड वॉश करण्यासाठी मला कलमा वाचायला लावला आणि इंजेक्शन देऊन मला बेशुद्ध करत होते. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांना ही बाब कळताच त्यांनी आरोपींनी मेरठ येथील सांगितलेल्या ठिकाणी 50 हजार दिले आणि माझी सुटका करून मला परत घेऊन आले. "

 

वडील म्हणाले - धोका देऊन मुलीला फसविले, इतर पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे..... कारण त्यांच्यासोबत असे होऊ नये 

पीडिताच्या वडिलांनी सांगितले की, आरोपींनी धोक्याने माझ्या मुलीला फसवले आणि तिच्यासोबत वाईट कृत्य केले. ज्यांची मुले सोशल मीडियाचा वापर करत आहेत त्या सर्वांच्या पालकांना मी विनंती करतो की, त्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, जेणेकरून त्यांच्यासोबत असे घडणार नाही. 

 

पोलिस म्हणाले - प्रकरण गंभीर, सर्वांची होणार कसून चौकशी 

पोलिसांनी सांगितले की, शहरातील हे असे पहिलेच प्रकरण आहे. यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याची कसून तपासणी करण्यात येत आहे. श्रीगंगानगर हॉटेलपासून ते मेरठपर्यंत सर्व आरोपींची यामध्ये चौकशी होणार आहे आणि कोणत्याच आरोपील क्षमा केली जाणार नाही.