आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकच्या माध्यमातून त्याने केली मैत्री..माजलगावातून मुलीला पळवून आणले जालन्यात,नंतर झाले असे काही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -  फेसबुकवरून अल्पवयीन मुलीशी ओळख करून बीड जिल्ह्यातून त्या मुलीला जालन्यात पळवून आणले. दरम्यान, दुचाकीवरून जात असताना अचानक पेट्रोलिंगवर असलेल्या चंदनझिरा पोलिसांना पाहताच मुलीने अजून तोंड झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, या जोडप्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, अल्पवयीन मुलगी त्या मुलासोबत पळून आल्याचे समोर आले. ८ दिवसांपूर्वी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी माजलगाव येथे दिली आहे. चिवळ्या ऊर्फ रवी त्रिंबक जाधव (दिंद्रुड, ता. माजलगाव) असे मुलाचे नाव आहे.    


चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हे औद्योगिक वसाहत भागात पेट्रोलिंगवर होते. दरम्यान, या परिसरात दुचाकीहून एक मुलगा, एक मुलगी जात असताना दिसले. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी अनिल काळे, कृष्णा भडांगे, गोपाल दिलवाले, श्रद्धा बर्डे यांना संशय आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, जोडप्याने कबुली दिली.  आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...