आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकने महिलांपासून लपवल्या नाेकरीच्या जाहिराती; अमेरिकेत संताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन- नामांकित साेशल मीडिया कंपनी फेसबुक पुन्हा एका वादात अडकली अाहे. प्रसारमाध्यमांतील बातम्यांनुसार फेसबुकने महिलांपासून नाेकरीच्या जाहिराती लपवून ठेवल्याचा व निवडकर्त्यांना नाेकरीसाठी महिलांची निवड हाेऊ नये म्हणून एक विशिष्ट टूल पुरवल्याचा अाराेप अाहे. या त्यामुळे अमेरिकेत संताप व्यक्त हाेत अाहे. 


महिलांविराेधात हाेत असलेल्या या भेदभावामुळे अमेरिकन नागरी स्वातंत्र्य संघ व (एसीएलयू) अाेट्टेन अँड गाेल्डमॅन एलएलपी या संस्थांनी मंगळवारी अमेरिकन समान राेजगार संधी अायाेगाकडे फेसबुकची तक्रार करून खटला दाखल केला अाहे. कार्यस्थळावर महिलांप्रती भेदभाव व नागरी अधिकारांचा दुरुपयाेग केल्याचा अाराेप करत त्यांनी दहा कंपन्यांना अायाेगात खेचले असल्याचे 'वाॅशिंग्टन पाेस्ट'ने म्हटले अाहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात नाेकरीच्या जाहिराती लपवल्याचा अाराेप नाेकरीचा शाेध घेणाऱ्या महिलांनी केला हाेता. 


दरम्यान, फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, फेसबुकमध्ये भेदभावाला काेणतेही स्थान नाही. त्यामुळे कंपनी अशा तक्रारींची नि:पक्ष चाैकशी करेल. भविष्यात असे प्रकार हाेऊ नयेत यासाठी कठाेर उपाययाेजना केल्या जातील. 

बातम्या आणखी आहेत...