आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपोर्ट/ बिटकॉइन सारख्या डिजिटल करंसीवर काम करत आहे फेसबूक, वॉट्सऐपने होईल ट्रांझॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- डिजिटल करंसीचे वाढते क्रेज पाहून फेसबुकपण बिटकॉइन सारख्या डिजिटल करंसीवर काम करत आहे. याची माहिती ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या करंसीला खासकरून भारतीय यूजर्सना केंद्रस्थानवर ठेवून तयार केले जात आहे आणि वॉट्सऐपच्या माध्यमातुन याचे ट्रांसफर करता येईल. 

 
यायला लागेल वेळ
ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, फेसबुकला आपली डिजिटल करंसी जारी करण्यासाठी वेळ लागु शकतो कारण कंपनी सध्या यावर काम करत आहे. ब्लूमबर्गने फेसबुकच्या एका प्रवक्त्याच्या विधानाचा पुरावा देताना सांगितले की, इतर कंपन्याप्रणाणे फेसबूकदेखील आता ब्लॉकचॅन टेक्नोलॉजीचा वापर करण्याच्या पद्धतीवर काम करत आहे आणि यासाठी त्यांनी एक टिमदेखील तयार केली आहे.

 
4 वर्षांपूर्वीपासूनच सांगितले जात होते
फेसबुकने मॅसेंजर अॅपसाठी 2014 मध्ये पेपालचे माजी प्रेसिडेंट डेविड मार्कस यांना हायर केले होते आणि त्यानंतरच यावर शंका व्यक्त केली जात होती की, फेसबुक फायनांशिअल सर्विसमध्ये पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर मार्कस यांना फेसबुकच्या ब्लॉकचैन इनिशिएटिवचा हेड बनवण्यात आले. 

 
2017 मध्ये 69 अब्ज डॉलर परदेशातुन भारतात आले.
भारतामध्ये वॉट्सऐपचे 20 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. फोरेस्टर रिसर्चनुसार, चीननंतर सगळ्यात जास्ती 48 कोटी यूजर्स भारतात आहेत, ज्यांची संख्या 2022 मध्ये 73.7 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. तर, वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार, लोकांनी जगभरातून भारतात 2017 मध्ये 69 अब्ज डॉलर पाठवले आहेत.


स्टेबल टोकनला ट्रॅक करणारी वेबसाइट स्टेबल.रिपोर्टनुसार, 2017 मध्ये स्टेबल कॉइनला जोडलेल्या क्रिप्टो प्रोजेक्टमध्ये बूम पाहण्यात आले आहे. जगातील  कंपन्या अशा डिजिटल कॉइनला तयार करण्यावर काम करत आहे, ज्याचा वापर करणे सोपे असेल आणि बिटकॉइन सारख्या डिजिटल करंसीपेक्षा जास्त स्टेबल असेल.

बातम्या आणखी आहेत...