आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व्हेची जाहिरात काढली, हाऊस स्पीकरचा नॅन्सीचाही होता विरोध

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेसंबंधीच्या जाहिराती हटवण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकने हा निर्णय अमेरिकेची जनगणना सुरू होण्याच्या तोंडावर घेतला आहे. अमेरिकेत पुढील आठवड्यापासून जनगणना सुरू होत आहे. गुरुवारी २०२० च्या जनगणनेशी संबंधित ट्रम्पच्या सर्व्हेच्या जाहिराती काढल्या. जाहिराती निवडणूक मोहिमेसाठी चालवण्यात येत होत्या. यामुळे जनगणनाच्या कालावधीवरून भ्रम निर्माण होत होता. जाहिरातीत म्हटले होते की, अध्यक्ष ट्रम्प आता अधिकृत २०२० काँग्रेसजन्य जिल्हा जनगणना करण्यासाठी तुमची गरज आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या निवडणुकीपूर्वी आम्हाला तुमचे मत ऐकून घ्यायचे आहे. तर हाऊस स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांनी ट्रम्पच्या निवडणूक माेहिमेतील जाहिरातीचे सर्व्हे भ्रम निर्माण करत असल्याचे म्हटले होते. ‘ट्रम्प मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशा जाहिराती ट्रम्प यांनी सुरुवात केल्या आहेत. ट्रम्पनी फेसबुकवर स्वत:ला नंबर १ म्हटले


ट्रम्प यांनी १५ फेब्रुवारी रोजी टि्वटरवर लिहिले, मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले, मी फेसबुकवर नंबर -१ आहे. तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर -२ वर आहेत. वॉशिंग्टन पोस्टनुसार, ट्रम्प खोटे बोलण्यात व दिशाभूल करण्यात पटाईत आहे. अध्यक्ष झाल्यानंतर १० हजार ७९६ वेळा खोटे बाेलले आहेत. जनगणना सोशल मीडियावर दबाव


नागरिक अधिकार समूहाने म्हटले, या जाहिरातीमुळे जनगणनेस ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेशी संबंध जोडला गेला आहे. जनगणना सोशल मीडिया कंपन्यांसाठी हे प्रचाराचे तंत्र बनले आहे. यामुळे फेसबुक, टि्वटर व यूट्यूबवर राजकीय भाषणे टाकण्यावर दबाव येतो आहे. टिवटरने राजकीय जाहिरातीवर काही दिवसापूर्वीच बंदी आणली होती. सोशल मीडिया कंपन्या राजकीय पक्षाचा प्रसार करत असतात. 
 

कोट्यवधी रुपये खर्च करतात उमेदवार


नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार राजकीय जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करू शकतात. यामुळे कंपन्या सतत धोरणे ठरविण्याची मागणी करत आहेत. राजकीय जाहिरातीसंदर्भात फेसबुकने सर्वाधिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यावर टीकाही झाली. फेसबुक राजकीय भाषणे व भ्रामक माहिती पोस्ट करणे व त्या लोकांपर्यंंत पोहचवण्यांची परवानगी देते. बातम्या आणखी आहेत...