Home | Business | Business Special | Facebook Spends usd22.6 Million To keep Mark Zuckerberg Safe

मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेवर तब्बल 156 कोटी रूपये खर्च, एका वर्षात 60 टक्के वाढ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 04:32 PM IST

2017 मध्ये 62.25 कोटी रूपये होता झुकरबर्ग यांच्या सुरक्षेचा खर्च

  • Facebook Spends usd22.6 Million To keep Mark Zuckerberg Safe

    बिझनेस डेस्क- फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या सुरक्षेवर मागील वर्षी तब्बल 2.26 कोटी डॉलर( 156.32 कोटी रूपये ) खर्च झाले आहेत. जवळजवळ 2 कोटी डॉलर एवढी रक्कम झुकरबर्ग आणि त्यांच्या कुटूंबाच्या सुरक्षेवर खर्च झाली आहे. 26 लाख डॉलर झुकरबर्गला प्रायव्हेट जेट वापर करण्यासाठी दिले, ही रक्कमसुध्दा सुरक्षासाठी खर्च झाली. फेसबूकने शुक्रवारी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली.


    शेरिल सॅंडबर्गचा वेतन भत्ता 10 कोटींनी कमी झाला

    2017 मध्ये झुकरबर्गच्या सुरक्षेचा खर्च 90 लाख डॉलर ( 62.25 कोटी रूपये ) होता. एक वर्षात हा खर्च 60 टक्के वाढला. परंतू बेसिक सॅलरी म्हणून झुकरबर्ग 3 वर्षापासून फक्त 1 डॉलर वार्षिक घेत आहेत. सीईओ शेरिल सॅंडबर्ग यांच्या सुरक्षेवर मागील वर्षी 29 लाख डॉलर ( 20 कोटी रूपये ) खर्च केले होते. 9 लाख डॉलर त्यांच्या खासगी विमानासाठी देण्यात आले. सॅंडबर्गला सॅलरी आणि भत्ता म्हणून मागील वर्षी 2.37 कोटी डॉलर (164 कोटी रूपये ) मिळाले. 2017 मध्ये ही रक्कम 2.52 कोटी डॉलर ( 174 कोटीं रूपये ) होती.


    फेसबुककडून निवडणुकित दखल आणि डाटाचा गैरवापर मागील एक वर्षात खूप वाढला आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा खर्च वाढवला आहे. कंपनीचे म्हणने आहे की, फाऊंडर, सीईओ, चेअरमॅन आणि कंट्रोलिंग शेअरहोल्डर म्हणून त्यांची सुरक्षा वाढवने गरजेचे होते.

Trending