आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook ट्वीट करतं तेव्हा... 9 तास बंद होते फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम, 4 अब्ज यूजर्सला फटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतासह जगभरात फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम अचानक बंद झाले. या सर्वच सोशल मीडिया कंपन्यांना सेवा पूर्ववत करण्यासाठी 9 तासांचा वेळ लागला आहे. फेसबूकवरून गुरुवारी सकाळी 5.36 वाजता ट्वीट करून या वृत्तास अधिकृत दुजोरा देण्यात आला. त्यानुसार, आमच्या अनेक यूजर्सला फोटो आणि व्हिडिओ अपलोड करताना समस्या येत आहेत. आता ती समस्या दूर करण्यात आली आहे. या असुविधेबद्दल सोशल मीडियाने दिलगिरकी देखील व्यक्त केली आहे.

 

 

 


फोटो-व्हिडिओ पाठवताना आल्या समस्या
फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम डाऊन असल्याचा फटका जगभरातील 4 अब्ज 4 कोटी लोकांना बसला आहे. या दरम्यान ट्विटर मात्र सुरळीत सुरू होते. त्यामुळे, बहुतांश लोकांनी ट्वीट करून आपल्या समस्या मांडल्या. अनेकांनी त्यावर स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केले. यात यूजर्सला फेसबूकच्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर अपलोडिंगच्या तक्रारी आल्या होत्या. फेसबूकने बुधवारी रात्री पावणे 10 वाजता ट्वीट करून आपल्याला या समस्येची माहिती मिळाली असून लवकरच दुरुस्त केले जाईल असे सांगितले. त्यानंतरही फेसबूकला ही समस्या दूर करण्यासाठी 9 तास लागले आहेत. अशाच प्रकारची घटना 19 एप्रिल रोजी सुद्धा घडली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम या फेसबूकच्याच कंपन्या आहेत. सोशल मीडिया वापरताना येणाऱ्या अडचणींची 75 लाख लोकांनी तक्रार केली आहे. यात लोकांनी कित्येकवेळा आपले फोन आणि डिव्हाइस रीस्टार्ट देखील केल्याचे म्हटले. परंतु, यातून काहीच फरक पडला नाही.