आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Facebook's 4 New Features For User Privacy Benefit From Sharing Photo, Profile Data

युजर प्रायव्हसीसाठी फेसबुकच्या 4 नव्या फीचरचा फोटो, प्रोफाइल डेटा शेअर करताना होतो फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को : युजरच्या डाटासाठी योग्य प्रायव्हसी पॉलिसी नसल्याने फेसबुकवर दीर्घकाळापासून टीका केली जात होती. आता प्रायव्हसी चेकअप टूल अपडेट केले आहे. कंपनीने मंगळवारी चार नवे फीचर आणले आहेत. याद्वारे युजर त्यांची छायाचित्रे, प्रोफाइल डाटा व इतर माहिती शेअर करताना प्रायव्हसी ऑप्शन सहज अपडेट करू शकतील. कंपनीने वर्ष २०१४ मध्ये प्रायव्हसी चेकअप टूल लाँच केले होते. आता अपडेटेड व्हर्जन सादर केले आहे.

हे आहेत अपडेटेड फीचर

  • हू कॅन सी व्हॉट यू शेयर : याद्वारे तुम्ही शेअर केलेली माहिती कोण पाहू शकेल, यावर नियंत्रण ठेवता येईल. यात फोन क्रमांक, ई-मेल इत्यादी माहिती समाविष्ट आहे
  • हाऊ पीपल कॅन फाइंड यू : तुम्हाला फेसबुकवर कोण शोधू शकेल, अथवा विनंती पाठवू शकेल, यावर नियंत्रण ठेवू शकता.
  • असे जाल प्रायव्हसी चेकअप टूलकडे : डेस्कटॉप साइटवर आलेल्या प्रश्नार्थक चिन्हावर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसी चेकअपची निवड करा. प्रश्नार्थक चिन्हाची खूण तुम्हाला नोटिफिकेशन साईटच्या बाजूलाच दिसेल.
  • कीप अकाउंट सिक्युअर : युजर अकाऊंटला अधिक सुरक्षित पासवर्ड व लॉगिन अॅलर्टने अधिक सिक्युअर करू शकतील.
  • डाटा सेटिंग्ज : युजर शेअर करत असलेली माहिती रिव्ह्यू करू शकतील. जे अॅप निरुपयोगी आहेत, ते काढू शकता.