आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकचे फेशिअल रेकग्निशन स्कॅन तंत्रज्ञान म्हणजे खासगीपणावर हल्ला : अमेेरिकी न्यायालयाला मान्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅनफ्रान्सिस्को - डाटा गैरवापराच्या प्रकरणात फेसबुकचे अपील अमेरिकेच्या एका न्यायालयाने फेटाळले आहे. कंपनीवर २.४८ लाख कोटी रुपयांचा (३५०० कोटी डॉलर) क्लास-अॅक्शन खटला दाखल केला होता. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सुनावणी होईल. फेसबुकचा या खटल्यात पराभव झाल्यास कंपनीला इलिनॉइसच्या ७० लाख लोकांना प्रति व्यक्ती ७१,००० ते ३,५५,४८३ रुपये (१००० ते ५००० डॉलर) भरपाई म्हणून द्यावे लागतील.

इलिनॉइसच्या नागरिकांनी फेशिअल रिकग्निशनसंबंधी डेटाच्या कथित गैरवापराबद्दल फेसबुकच्या विरोधात ३५०० कोटी डॉलरचा खटला दाखल केला होता. टेकक्रंचच्या अहवालानुसार, सॅनफ्रान्सिस्कोममध्ये ९ सर्किटच्या न्यायाधीशांच्या ३ न्यायाधीश पॅनलने फेसबुकची याचिका खारिज केली आहे. आता सर्वोच्च न्यायालय जेव्हा हस्तक्षेप करेल तेव्हाच या प्रकरणाची सुनावणी होईल. इलिनॉइसच्या नागरिकांनी अपलोड केलेल्या आपल्या फोटोचे फेशिअल रिकग्निशन संबंधित स्कॅन करण्याची परवानगी दिली   नव्हती, असा आरोप फेसबुकवर आहे.फेसबुकने २०११ मध्ये फेशिअल रिकग्निशनसंबंधी स्कॅन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला होता. त्यात तुमच्याद्वारे अपलोड केेलेल्या छायाचित्रात जे लोक टॅग केले आहेत त्यांना ते ओळखतात की नाही, असे फेसबुक युजर्सला विचारले जाते. सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले की, ‘फेशिअल रिकग्निशन स्कॅन तंत्रज्ञान लोकांच्या खासगीपणावर हल्ला आहे.’ न्यायालयाने हेही मान्य केले की, फेशिअल रिकग्निशन तंत्रज्ञान इलिनॉइसच्या बायोमेट्रिक इन्फर्मेशन प्रायव्हसी अॅक्टचे (बीआयपीए) उल्लंघन करते. 

हा खटला २०१५ मध्ये दाखल झाला होता. तेव्हा फेसबुकने तो खारिज करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण त्यात यश मिळू शकले नाही. या निर्णयानंतर फेसबुकच्या शेअरची किंमत २.२५ टक्के घसरली आहे.
 

फेसबुकवरील मोठे खटले, दंड
> जुलै २०१९ : अमेरिकन नियामकांनी डेटा चाेरी आणि प्रायव्हसीसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकला ३४ हजार कोटी रुपयांचा दंड ठाेठावला.
> डिसेंबर २०१८ : केम्ब्रिज अॅनालिटिका घोटाळ्यात वॉशिंग्टनमधील एका वकिलाने खटला दाखल केला. फेसबुकवर कोट्यवधी युजर्सच्या खासगी डेटात हस्तक्षेपाची परवानगी दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात ब्रिटनमध्ये कंपनीवर ५ लाख पौंड दंड ठोठावला होता.