आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Facelist Version Of Hyundai Creta And Tucson SUV To Arrive At Auto Expo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ह्युंडे क्रेटा आणि टक्सन एसयूव्हीचे फेसलिस्ट व्हर्जन ऑटो एक्स्पोमध्ये येणार, भविष्यातील तंत्रज्ञानावर भर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नवी ह्युंडे क्रेटा आणि ह्युंडई टक्सन फेसलिस्टची प्रतीक्षा संपत आली आहे. कंपनी ग्रेटर नोएडामध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपो २०२० मध्ये या दोन कारवरील पडदा उठवेल. नवी क्रेटा ६ फेब्रुवारीला तर टक्सन फेसलिस्ट ५ फेब्रुवारीला सादर केली जाईल. ५ फेब्रुवारीला सुरू होत असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये ह्युंडे कारचा बाजारात मोठी रेंज आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करेल. ज्यात दोन एसयूव्हीचा समावेश असेल. ऑटो एक्सपोमध्ये ह्युंडेची थीम “फ्यूचर मोबिलिटी’ आहे. या थीमअंतर्गत कंपनी १३ कार, भविष्यातील तंत्रज्ञान आणि कॉन्सेप्ट कारचे प्रदर्शन करेल. या मोटार शोमध्ये कंपनी कोना इलेक्ट्रिक व नेक्सो एफसीईव्हीचे प्रदर्शन करेल.नव्या फीचर्ससह येतीये क्रेटा : नव्या क्रेटाचे डिझाइन स्केच प्रदर्शित झाले आहे. ही नव्या प्लॅटफॉर्म बेस्ड असेल. यामध्ये अनेक नवे फीचर मिळतील. किमतीबाबतीचा खुलासा झाला नाही.