आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वाढते प्रदूषण, तणाव आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि काळे डाग दिसू लागतात. यामुळे कित्येक लोकांना मुरूम होतात किंवा एक्नेची समस्या होऊ शकते. या समस्या दूर करण्यासाठी फेशियल योगा परिणामकारक होऊ शकतो. नियमित केल्यास त्वचा टाइट होते.
हास्य योग
ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी डोळ्यांतून अश्रू येईपर्यंत हसा. यामुळे शरीरातील ६०० मांसपेशींचा व्यायाम होतो. खळखळून हसल्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली होते. यामुळे फुप्फुसामध्ये ऑक्सिजन जाते. रक्त शुद्ध होते आिण चेहऱ्यावर चमक येते.
स्माइल फिश फेस पोज
गालांना आत ओढून चेहऱ्याचा आकार माशासारखा करा. याला १० सेकंदापर्यंत करा आणि चार ते पाच वेळा करा. या आसनामुळे ओठांचे सौंदर्य वाढते आिण चेहऱ्याची अतिरिक्त चरबी कमी होते.
सिंहगर्जना आसन
वज्रासनात बसा. गुडघ्यांमध्ये थोडे अंतर ठेवा. दोन्ही हातांच्या बोटांना सिंहाच्या पंज्याप्रमाणे दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. आत श्वास घेऊन जीभ बाहेर काढा आिण नंतर श्वास सोडत सिंहगर्जना करा. या क्रियेत ताेंड जास्तीत जास्त उघडे असले पाहिजे. घशाच्या मांसपेशींमध्ये तणाव आणा. हे आसन ३ ते ४ वेळा करू शकता.
फेशियल योगा
पद्मासनात बसून तुमचे तोंड तोंंडाला अशाप्रकारे करा जसे गाय किंवा म्हैस चारा खाल्ल्यानंतर रवंथ करत राहाते. या क्रियेला कमीत कमी २ मिनिटांपर्यंत करत राहा. शांतपणे बसून दोन्ही हातांच्या बोटांची चापट तुमच्या गालांवर हळूहळू मारा. ही प्रक्रिया दररोज २ ते ३ मिनिटे करा. यामुळे चांगला परिणाम होतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.