आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fact Check Home Found 19 Years Old Mobile, 70% Charge On Battery After Switching On, What Is The Real ...?

फॅक्ट चेक/ घरात सापडला 19 वर्षे जुना मोबाइल, स्विच ऑन केल्यावर बॅठरी 70% चार्ज निघाली, काय आहे खरं...?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- काही दिवसांपूर्वी एक बातमी आली की, इंग्लंडच्या एलेस्मेरेमधील एका व्यक्तीला घरात 19 वर्षे जुना नोकिया 3310 मोबाईल सापडला. त्याने फोनला स्विच ऑन केल्यावर त्याला इतक्या वर्षे बंद असलेल्या फोनमध्ये 70 % चार्जिंग दिसली. आता ही बातमी फॅक्ट चेकमध्ये खोटी असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्समध्ये या व्यक्तीचे नाव केविन मूडी असल्याचे सांगितले आहे.


केविनने सांगितले, "काही दिवसांपूर्वी तो घरात चावी शोधत होतो. तेव्हा मला एक मोबाईल सापडला. मी हा मोबाईल 19 वर्षांपूर्वी खरेदी केला होता. मी तर त्या फोनबद्दल विसरुन गेलो होतो. मला लक्षातही नाही की, मी फोनला कधी चार्ज केले आहे."


नोकियाचे हे मॉडल सन 2000 मध्ये लॉन्च झाले होते. हा कंपनीचा सर्वात स्वस्त फोन होता. हा फोन त्याच्या मजबुतीमुळे सर्व जगात खूप नावजला गेला. याच्या मजबुतीमुळेच कंपनीने मागच्या वर्षी याचे नवीन मॉडेल लॉन्च केले होते.

फॅक्ट काय सांगते
मीडिया रिपोर्ट्समध्ये ज्या व्यक्तीचा फोटो शेअर झाला आहे, केविन मूडी नाही तर डेव मिशेल आहे. डेव 2000 पासून या फोनचा वापर करत आहे. त्याने काही दिवसांसाठी मोबाईलला बंद केले होते. पण त्याने कधीच असा दावा केला नाही की, त्याने फोनला विसरला होता आणि इतक्या वर्षानंतर फोन ऑन केल्यावर 70 टक्के चार्जिंग होती. त्यामुळे ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे.