आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनु राशीच्या लोकांच्या 15 खास गोष्टी, जाणून घ्या कसा राहतो यांचा स्वभाव 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ये, यो, भा, भी, भू, ध, फा, ढा, भे पासून सुरु होत असेल त्यांची राशी धनु राहते. या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. चिन्ह धनुष्यधारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, धनु राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...


1. ही द्विस्वभाव असलेली राशी असून, या राशीचे चिन्ह धनुष्यधारी आहे. ही राशी दक्षिण दिशेचे द्योतक आहे.
2. धनू राशीच्या व्यक्ती खूपच खुल्या विचारांच्या असतात. तसेच जीवनाचा अर्थ ते सहज समजून घेतात.
3. इतरांबाबत जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते.


4. या राशीच्या व्यक्तींना रोमांच खूप आवडतो. बेधडक, आत्मविश्वास असलेल्या, महत्त्वाकांक्षी व स्पष्टवक्ते असतात.
5. यांच्या मतानुसार त्यांनी ज्यांची पारख केलेली असते तेच खरे असते. त्यामुळे त्यांची मित्रसंख्या कमी असते.
6. या राशीच्या व्यक्ती मध्यम अंगकाठीच्या असतात. तसेच यांचे केस भुरकट आणि डोळे मोठे असतात.


7. या व्यक्तींमध्ये धाडस हा गुण कमी प्रमाणात असतो. करिअरसाठी जीवनसाथी वा वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात.
8. या राशीच्या मुली इतरांवर विश्वास ठेवताना चारदा विचार करतात. त्या उंच असतात व इतरांशी सहज मैत्री करत नाहीत.
9. आपल्या शिक्षण आणि करिअरमुळे जोडीदार आणि वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात.


10. धनु राशीच्या मुली सहजरीत्या कोणाशीही मैत्री करत नाहीत.
11. हे एक उत्तम श्रोता असतात आणि यांना खुल्या मनाचे आणि प्रामाणिक व्यवहार करणारे लोक आवडतात. या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहणी तसेह करिअरमध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा बाळगून असतात.
12. यांना जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. हे सुखी आणि संपन्न जीवन व्यतीत करतात.


13. या राशीचे लोक द्विधा मनस्थितीमध्ये राहणारे असतात. एकाध निर्णय घेण्यासाठी यांना खूप वेळ लागतो. हा उशीर अनेकवेळा यांना नुकसानदायक ठरतो.
14. हे लोक इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाहीत आणि स्वतःचे काम करण्यातच दंग राहतात.
15. कष्ट करूनच यांना सुख प्राप्त होते. वडिलोपार्जित व्यवसायामध्ये वृद्धी करतात.

बातम्या आणखी आहेत...