रंजक : हिरा / रंजक : हिरा चाखल्याने किंवा गिळल्याने मृत्यू होत नसतो 

हिरा गिळल्यानंतरही त्याला पैलू पाडताना हिऱ्याचे कोन किती तीक्ष्ण केले जातात, यावर ते अवलंबून आहे. योग्य प्रकारे पैलू न पाडलेला हिरा गिळल्यास अन्ननलिकेतून जाताना नलिकेला किंवा आतड्यांना तो जखमी करतो

दिव्य मराठी वेब टीम

Feb 21,2019 12:03:00 AM IST

हिरा चाखल्याने किंवा तो गिळून घेतल्यास माणूस मरतो, असा सर्वसाधारण समज आहे. अनेक चित्रपटांमधूनही हा गैरसमज पसरवला गेला. पण यात फार तथ्य नाही. हिरा कितीही चाखला तरी त्यातून विष पसरत नाही. पण हिरा गिळल्याने काही प्रमाणात मृत्यू संभवू शकतो. पण ही शक्यता फार कमी असते. हिरा गिळल्यानंतरही त्याला पैलू पाडताना हिऱ्याचे कोन किती तीक्ष्ण केले जातात, यावर ते अवलंबून आहे. योग्य प्रकारे पैलू न पाडलेला हिरा गिळल्यास अन्ननलिकेतून जाताना नलिकेला किंवा आतड्यांना तो जखमी करतो. यामुळे अंतर्गत रक्तस्राव होतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू होतो.


हिरा चावून खाणे शक्य नाही. तो कुटून त्याची पूड गिळल्यास ती काचेसारखी होते. यामुळे आतून जखमा होऊन मृत्यू होतो. पण आधुनिक तंत्रज्ञानाने पैलू पाडलेले आजकालचे हिरे गिळल्यावर काहीही नुकसान होत नाही. खूप मोठ्या आकाराचा हिरा गिळल्यास आहार नलिकेत अडकून मृत्यू होऊ शकतो. अमेरिकेतील जर्नल ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी क्लिनिकमध्ये प्रकाशित एका माहितीनुसार, हिरा गिळल्यावर शरीराला ३५ टक्के धोका संभवू शकतो. कार्बनपासून बनलेला हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ असतो, पण तो विषारी नसतो.

X
COMMENT