आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णाचा मुलगा सांबाला झाला होता कुष्ठ रोग, उपचारासाठी दिला सूर्यपूजेचा सल्ला; जाणून घ्या सूर्याच्या 12 अर्क स्थानांचे महत्व

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 रिजनल डेस्क - सूर्याचे 12 अर्क स्थान आहेत. एका वर्षात 12 महीने असतात आणि सूर्योदय ते सूर्यास्तादरम्यान 12 तासाचे अंतर असते. त्यातल्या त्यात सूर्य 12 राशींमध्ये निरंतर भ्रमण करीत असतो. देशात असलेल्या सूर्याच्या अर्क स्थानांपैकी निम्मे अर्कस्थान बिहारमध्ये आहेत. बिहारमधील या अर्क स्थानांच्या एकाग्रतेमुळे सूर्योपासनेचे महापर्व असलेल्या छठाच्या सुरूवातीचे स्पष्ट संकेत मानले जातात.

 

पुराणांमध्ये श्रीकृष्ण पुत्र सांबाला श्रापामुळे झालेल्या कुष्ठ रोगाचे निदान करण्यासाठी सूर्यपूजा सांगितली आहे. पुराणांमध्ये हे देखील सांगितले आहे की, मथुरा येथील सूर्य मंदीराची स्थापना सांबाने केली आणि त्यासाठी त्याने शाकद्वीप येथून 'मग पुजाऱ्यांना' पाचारण केले होते. 'मग पुजारी' सूर्याचे उपासक आहेत आणि त्यांना सूर्याचा अंश मानले जाते. यांनाच शाकद्वीपीय ब्राह्मण म्हटल्या जाते. मगध हे सूर्य उपासक शाकद्वीपीय ब्राह्मणांच्या वसाहतीचे क्षेत्र आहे. बिहारमध्ये असलेले चार अर्कस्थान मगधच्या क्षेत्रात आहेत. सर्व अर्क ठिकाणांच्या स्थापनेची कथा सांबाशी जोडलेली आहे.

 

12 अर्क स्थान

1. देवार्क, औरंगाबाद
2. ओलार्क, पाटना
3. पुण्यार्क, पाटना
4. औगार्क, नालंदा
5. बालार्क, नालंदा
6. मार्केण्डे यार्क, सहरसा
7. लोलार्क, काशी
8. कोणार्क, उडीसा
9. कटलार्क, उत्तराखंड
10. चानार्क, चंद्रभागा
11. आदित्यार्क, पंजाब
12. मोढेरार्क, गुजरात

 

सूर्याचे 12 रूप आणि 12 महीन्यांचा संबंध

सूर्याची किरणे वनस्पतींमध्ये औषधीय अर्क निर्माण करतात. शास्त्रांमध्ये सूर्याचे बारा रूप आहेत. या 12 रुपांचा मराठी महिन्यांशी संबंध आहे. प्रत्येक महिन्यात सूर्याचे वेगळे रूप दर्शविलेले आहे.
 
विष्णु - चैत्र महिना: अधर्माच्या विनाशासाठी अवतार घेणे. 
अर्यमा - वैशाख महिना: संपूर्ण विश्वात राहणे आणि त्याची रक्षक करणे. 
विवस्वान् - ज्येष्ठ महिना: अग्निमध्ये निवासीत होऊन अन्नाचे पचन करणे. 
अंशुमान - आषाढ महिना: चंद्रद्वारे शीतलता देणे.
पर्जन्य - श्रावण महिना: सूर्याच्या किरणांमध्ये निवास करून पाऊस पाडणे. 
वरुण - भाद्रपद महिना: पाण्याद्वारे विश्वाला जीवन देणे.
इंद्र - अश्विन महिना: राक्षसी शक्तिचा नाश करणे.
धाता - कार्तिक महिना: सृष्टिची रचना. 
मित्र - मार्गशीर्ष महिना: हवेद्वारे सजिवांना जीवन देणे. 
पूषा - पौष महिना: मंत्रांद्वारे पोषण व कल्याण करणे.
भग - माघ महिना: जमीन आणि पर्वतांमध्ये निवास करणे. 
त्वष्टा - फाल्गुन महिना: झाडे आणि वनस्पतींमध्ये निवास करणे.

 

बातम्या आणखी आहेत...