सूर्याच्या सर्वात जवळील / सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह असनूनदेखील बुध उष्ण नाही, जाणून घ्या कारण

शुक्राचे वायुमंडल मुख्यत: कार्बन डायअाॅक्साइडने भारलेले अाहे, ज्यास ग्रीन हाऊस गॅस म्हणून अाेळखले जाते. ग्रीन हाऊस गॅस उष्णतेला बाहेर जाण्यापासून राेखते.

Dec 14,2018 02:05:00 PM IST

बुध ग्रह सूर्याच्या सर्वाधिक जवळ अाहे. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की, ताे सर्वाधिक उष्ण असेल. परंतु वास्तव असे की, सर्वाधिक उष्ण ग्रह बुध नव्हे, तर शुक्र अाहे. बुध केवळ सर्वाधिक उष्ण नाही, असेच नव्हे, तर येथील तापमान उणे १७६ अंशांपर्यंत घसरते. त्याचे कारण असे की, बुध ग्रह सूर्याच्या सर्वाधिक जवळ असल्यामुळे त्याचे वायुमंडल नष्ट झाले अाहे. सर्वाधिक तापमान वाढते तेव्हा त्याची उष्णता अंतराळात विरून जाते. दिवसाचे तापमान ४२७ अंश, तर रात्रीचे ० पासून उणे १७६ अंशांपर्यंत गारेगार असे असते.


शुक्राचे वायुमंडल मुख्यत: कार्बन डायअाॅक्साइडने भारलेले अाहे, ज्यास ग्रीन हाऊस गॅस म्हणून अाेळखले जाते. ग्रीन हाऊस गॅस उष्णतेला बाहेर जाण्यापासून राेखते. त्यामुळे सूर्याची उष्णता शुक्राच्या वातावरणात प्रवेश करते, तर ती पुन्हा बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच शुक्र जणू एखाद्या भट्टीसारखा अाहे. या ग्रहाचे दिवसा-रात्रीचे तापमान सुमारे ४६२ अंश सेल्सियस असते.


शुक्राचे तप्त वातावरण संशाेधकांना त्याविषयी अधिक संशाेधन करण्यापासून राेखते. रशिया हा पहिला देश अाहे, ज्याने १९८१ मध्ये व्हेनेरा-१३ सारखी माेहीम शुक्रावर पाठवली हाेती. या यानाने शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावरील काही छायाचित्रे पाठवली हाेती. अत्यधिक तप्त वातावरणामुळे पाठवलेला प्राेब सुमारे ३ तासांत वितळून नष्ट झाला. त्यानंतर १९९० मध्ये नासाचे मॅगेलन अंतराळ यान (प्राेब) शुक्रावर पाेहाेचण्यात यशस्वी ठरले हाेते.

X