आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Facts Check On Kejriwals Allegations On Vinod Tawade Regarding Maharashtra School Closures

महाराष्ट्रात विनोद तावडेंनी खरंच बंद पाडल्या 1300 सरकारी शाळा? केजरीवालांच्या आरोपांचे फॅक्ट चेक!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आपमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर नगण्य प्रकारचे आरोप करत आहेत. भाजपचे विविध राज्यातील नेते आणि मंत्री दिल्लीत जाऊन प्रचार करत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचाही समावेश आहे. तावडे यांनी दिल्ली दौरा करून भाजपचा प्रचार केला. अशात बुधवारी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तावडे यांच्यावर एक गंभीर आरोप केला. त्यानुसार, तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांच्या सरकारने महाराष्ट्रात 1300 शाळा बंद पाडल्या. त्याचाच पाठपुरावा divyamarathi.com ने घेतला आहे.

डिसेंबर 2017 मध्ये केली होती घोषणा

डिसेंबर 2017 मध्ये महाराष्ट्रातील हजारो सरकारी शाळा बंद पाडल्या जात असल्याचे वृत्त सर्वप्रथम चर्चेत आले. त्यावेळी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शिक्षण मंत्री (तत्कालीन) विनोद तावडे यांच्या मंत्रालयाने राज्यातील 1312 सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तावडे यांनी स्वतः यासंदर्भातील घोषणा केली होती. शिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आरटीई अर्थात राइट टू एजुकेशनचा दाखला सुद्धा देण्यात आला होता. त्यानुसार, ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी असतील त्या शाळा बंद करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. 2009 मध्ये राज्य सरकारने एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये 12 हजार पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. तर 5000 शाळा अशा आहेत ज्या ठिकाणी वर्गांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी येतात.

वाद झाल्यानंतर दिले असे स्पष्टीकरण

या निर्णयावरून महाराष्ट्रासह देशभर वाद झाला होता. तसेच हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जानेवारी 2018 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस सुद्धा बजावली होती. त्यानंतर विनोद तावडेंनी आपल्या निर्णयाचा बचाव केला होता. शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचा वाइट प्रचार केला जात आहे असा आरोपच तावडेंनी केला होता. त्यांनी दावा केला होता, की ज्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थीच नसतील तर ती शाळा कशी चालणार. सोबतच, बंद झालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना 3 किमीच्या आत असलेल्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. सोबतच, त्यांना वाहतुकीची सुविधा सुद्धा दिली जाणार असे त्यांनी आश्वस्त केले होते. एवढेच नव्हे, तर आपण घेतलेला निर्णय राज्यात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योग्यच आहे असा दावा तावडे यांनी केला होता. अर्थातच केजरीवाल यांनी केलेला आरोप खरा असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...